Sunburn Music Festival Goa Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival Goa: 'गोव्यातला हा माझा शेवटचा सनबर्न...प्रवास इथेच संपला!' सनबर्न आयोजकाची भावनिक पोस्ट चर्चेत

सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे

Kavya Powar

Sunburn Music Festival Goa: जगभरातील संगीत महोत्सवांच्या पहिल्या तीन क्रमांकांच्या यादीत स्थान असलेला 'सनबर्न' यंदा अधिकच वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्यातच सनबर्नचे आयोजक हरिंद्र सिंग यांनी 2023 वर्षातला महोत्सव त्यांचा शेवटचा असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

''डिसेंबर 2023 मधला गोव्यातला हा माझा शेवटचा सनबर्न. हा प्रवास इथेच संपतो... यामध्ये मी अनेकांचा आभारी आहे. या प्रवासात खूप कष्ट, भावना आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. मी मागील इतकी वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन करू शकलो याचा मला आनंद आहे. पण पुन्हा मी ते करू शकणार नसल्याचे दु:खही आहे.'' असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर लिहिले आहे.

त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी दु:ख व्यक्त केले. त्यांच्या या निर्णयामागे नेमके काय कारण आहे, हे कळू शकले नाही.

इथे पहा इन्स्टाग्राम पोस्ट :

यंदाच्या सनबर्नचे काय?

गेल्यावर्षी 12 वाजेपर्यंत संगीत वाजवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र यंदा निर्बंध वाढवून फक्त 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली. यामुळे खास सनबर्नसाठी म्हणून गोव्यात येणाऱ्यांचा हिरमोड झाला. याचा फटका महोत्सवालाही बसला असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सनबर्न त्यात आयोजकांंनी हा निर्णय घेतल्याने यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या महोत्सवाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT