Sunburn Festival Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Goa 2023: मोपा येथे होणार यावर्षीचा सनबर्न? मनोहर विमानतळाजवळ संगीत महोत्सव घेण्याचा प्रस्ताव

पेडणे तालुक्यातून मात्र मोपा येथे नियोजित सनबर्नला विरोध होत आहे.

Pramod Yadav

Sunburn Goa 2023: गोव्यात होणारा यावर्षीचा सनबर्न 2023 संगीत महोत्सव उत्तर गोव्यातील मोपा येथे होणार असल्याची माहिती आहे. नव्याने झालेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात हा महोत्सव होण्याची शक्यता अधिक आहे. याबाबत प्रस्ताव मंजूरी अंतिम टप्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सनबर्नचे प्रमोटर हरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. सनबर्न मोपा विमानतळाजवळ घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून, तो मंजुरीच्या अंतिम टप्यात असल्याचे माहिती समोर आलीय. त्यामुळे यावर्षीचा सनबर्न मोपा विमानतळ परिसरातच होणार हे जवळपास निश्चत आहे.

पेडणे तालुक्यातून मात्र मोपा येथे नियोजित सनबर्नला विरोध होत आहे. पेडणे तालुक्यातील संस्कृतीला तिलांजली देण्याचे काम आयोजक करत असून त्यांना सरकारचे पाठबळ मिळत आहे,अशा प्रतिक्रिया तालुक्यातून उमटत आहेत.

आमदार प्रवीण आर्लेकरांचा विरोध कायम

मोपा येथे नियोजित सनबर्नला पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकरांनी पहिल्यापासून विरोध दर्शवला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत, मोपा येथे सनबर्न होऊ नये यासाठी सरकारने यात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.

दरम्यान, गोव्यातील सनबर्नवर महोत्सवाकडे जगभरातील पर्यटकांचे लक्ष असते. दरवर्षी अंजुना, वागातोर या ठिकाणी 28, 29, 30 डिसेंबर असे तीन दिवस महोत्सव असतो. यंदा ही पार्टी मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टवर करण्याचा घाट आयोजकांनी घातल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT