Goa Sunburn Festival 2024 Dainik Gomantak
गोवा

Sunburn 2024: 'धारगळी सनबर्न इवेंट जावपाक पुराय विरोध आसा' जागा ठरली; पण आमदार आणि सरपंचासह स्थानिक आक्रमक

Goa Sunburn Festival 2024: यंदाच्या वर्षी सनबर्न धरगाळ येथे होणार असल्याची माहिती समोर आली, मात्र आता स्थानिक तसेच पेडण्याच्या आमदारांकडून याला विरोध दर्शवला जातोय

Akshata Chhatre

Sunburn Festival Goa 2024

पेडणे: गोव्यात होणारा एक बहुचर्चित सोहळा म्हणजेच सनबर्नला उत्तर आणि दक्षिण गोव्यातून विरोध झाला, आणि यानंतर यंदाच्यावर्षी गोव्यात सनबर्न होणार की नाही असा प्रश्न उभा राहीला होता मात्र बुधवार (दि. १३ नोव्हेंबर) रोजी समोर आलेल्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी सनबर्न धरगाळ येथे होणार आहे. मात्र आता सनबर्नला स्थानिक तसेच पेडण्याच्या आमदारांकडून विरोध दर्शवला जातोय.

पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी धारगळ येथील ग्रामस्थांकडून या संगीत सोहळ्याला विरोध केला जातोय अशी माहिती दिली. सनबर्न सारख्या उत्सवांमुळे संस्कृतीला ठेस पोहोचते, आपण स्वतः देखील या बाबतीत स्थानिकांच्या बाजूने असल्याचं म्हणत त्यांनी धारगळ येथे होणाऱ्या सनबर्नचा विरोध केला.

सरकारला स्थानिकांच्या मताची किंमत नाही

धारगळ येथे होणारा सनबर्न जर का सरकारच्या परवानगीने होत असेल तर याला स्थानिकांकडून विरोध केला जाईल, मात्र जर का सनबर्नला सरकारची परवानगी मिळालेली नसेल तर हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

गोव्यात होणाऱ्या सनबर्नला स्थानिकांकडून विरोध दर्शवला जातोय आणि तरीही जर का सरकार याकडे दुर्लक्ष करत परवानगी देत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं ठरेल असे आप नेते अमित पालेकर यांचे म्हणणे आहे.

गोव्यात होणारा सनबर्न संगीत महोत्सव धारगळला होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला कसून विरोध केला जातोय. यंदाच्या वर्षी सनबर्न धारगळ येथे होईल अशी जाहिरातबाजी करण्यात आली आहे. सनबर्नला विरोध होणार, हे गृहीत धरलेले असताना तिकीट सवलतीसाठी राजन यांच्याशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले होते. गेल्या वर्षी देखील पेडण्यात सनबर्नचा सोहळा होणार होता, मात्र स्थानिकांनी विरोध दर्शविल्यामुळे हा निर्णय ठप्प झाला.

बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. नको असलेले फेस्टिव्हल आणून युवकांना व्यसनाधीन बनवू नये. धारगळ पंचायत क्षेत्रातील जनतेला काय हवे, याचा अगोदर सरकारने विचार करायला हवा. सनबर्नसारख्या पार्ट्यांची धारगळवासीयांनी कधीच मागणी केलेली नाही. धारगळ पंचायत क्षेत्रात कोणत्याही स्थितीत सनबर्न फेस्टिव्हलला सरकारने परवानगी देऊ नये असे धारगळीचे सरपंच अनिकेत साळगावकर म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT