Sun Estates Developers Unveils Hospitality Expansion In Goa
Sun Estates Developers Unveils Hospitality Expansion In Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात क्रांती घडणार! सन इस्टेट डेव्हलपर्सकडून 1,000 कोटींची गुंतवणूकीची घोषणा

Manish Jadhav

Sun Estates Developers Unveils Hospitality Expansion In Goa: दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात. गोवा हे देशातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. गोवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सुंदर समुद्रकिनारा, नाइटलाइफ आणि बरचं काही तरळून जातं....दरम्यान राज्यात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत आहे. पर्यटन क्षेत्राचा विकास कशापद्धतीने करता येईल याचा आराखडाही आखला जात आहे.

यातच, रिअल इस्टेटमध्ये नावाजलेली कंपनी सन इस्टेट डेव्हलपर्सने गोव्याच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने तब्बल 1,000 कोटींची गुंतवणूकीची घोषणा केली आहे. कंपनीने गुंतवणूकीमागील आपला हेतूही स्पष्ट केला. कंपनीने म्हटले की, देशासह जगभरातील पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासोबतच उत्तम हॉस्पिटॅलिटी उपलब्ध करुन देणे आहे.

दरम्यान, प्रतिष्ठित ॲस्टर हॉटेलच्या अधिग्रहणासह त्यांच्या अलीकडील प्रोजेक्टच्या यशावर आधारित सन इस्टेट डेव्हलपर्स त्यांच्या नवीन प्रकल्पाचे अनावरण करणार आहे. उत्तर गोव्यात सात हॉटेल्स धोरणात्मकरीत्या विकसित केले जातील, ज्यामध्ये प्रत्येकी 75 ते 80 रुम असतील. त्याचबरोबर ही हॉटेल्स समुद्रकिनाऱ्यापासून 800 ते 900 मीटर अंतरावर असतील. या विस्तारित प्रकल्पातील प्रत्येक हॉटेलमध्ये आउटसोर्स केलेले रेस्टॉरंट, स्पा आणि जिम असेल. त्याचबरोबर उत्तम नेटवर्कसह आघाडीच्या ब्रँडेड हॉटेल चेनद्वारे चालवले जातील. याशिवाय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वास्तुविशारदांनी डिझाइन केलेले सर्व्हिस अपार्टमेंट असतील.

सर्व्हिस्ड अपार्टमेंट्स व्यतिरिक्त, सन इस्टेट डेव्हलपर्स 10 बुटीक मॅन्शन सुरु करण्याची योजना आखत आहेत, ज्यामध्ये जागतिक दर्जाच्या सेवा ऑफर केल्या जातील. हे बुटीक मॅन्शन गोव्याच्या नयनरम्य समुद्रकिनारी असतील. या मॅन्शनमध्ये प्रायव्हेट जलतरण तलाव असतील. याशिवाय, प्रशस्त रुमसह एक खास आणि विलासी अनुभव मिळेल.

याशिवाय, सन इस्टेट डेव्हलपर्सचे लक्ष्य 5 पंचतारांकित लक्झरी हॉटेल्स साकारण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये बॉलरुम, जिम, स्पा आणि अगदी कॅसिनोसह अत्याधुनिक सुविधा असतील, ज्या अतिथींना ऐश्वर्य आणि विश्रांतीचा अतुलनीय अनुभव देतील. उत्तर गोव्याच्या मध्यभागी स्थित, ही हॉटेल्स लक्झरी आणि अत्याधुनिकतेचे प्रतीक म्हणून काम करतील.

दरम्यान, या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टबाबत भाष्य करताना सन इस्टेट डेव्हलपर्सचे एमडी सूरज मोराजकर म्हणाले की, “आम्ही गोव्यातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात सर्वसमावेशक योजनांचे अनावरण करण्यास उत्सुक आहोत. लक्झरी हॉस्पिटॅलिटीमधील नवीन मानके एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून गोव्याचे आकर्षण आणखी वाढवतील."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT