Heat Wave Dainik Gomantak
गोवा

Summer Health Care : पाणी प्या,योग्य आहार घ्या अन् सुती, सैल कपडे वापरा

Summer Health Care : उष्णतेपासून बचावासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

गोमन्तक डिजिटल टीम

Summer Health Care :

पणजी, शहरात उन्हाचा चटका पुन्हा वाढला आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती सध्या शहराच्या वेगवेगळ्या भागात दिसत आहे.

उष्णतेशी संबंधित समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी सातत्याने पाणी पिणे, योग्य आहार आणि सुती, सैल कपड्यांचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमान पुन्हा सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढला आहे. कमाल तापमानाच्या पाऱ्याने पुन्हा चाळिशी ओलांडल्याने प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्वाती गायकवाड यांनी हा सल्ला दिला आहे.

उष्णतेची लाट म्हणजे काय?

उष्णतेची लाट ही एक मूक आपत्ती आहे. सलग तीन दिवस कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ डिग्री सेल्सिअसने जास्त असेल, तर त्याला उष्णतेची लाट म्हणतात.

काय परिणाम होतो?

उष्णतेशी संबंधित (सौम्य ते गंभीर) आजारांमध्ये अंगावर पुरळ, सूज (उष्णतेमुळे हात, पाय आणि घोट्याला सूज येणे), पेटके (उष्णतेमुळे स्नायूंमध्ये पेटके), उष्माघात, गोंधळल्यासारखे वागणे, काहीही न सुचणे, उष्णतेमुळे थकवा यांचा समावेश होतो.

उष्णतेमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, श्वसन, मूत्रपिंड रोगांसारख्या जुनाट आजारांवरील ताण देखील वाढू शकतो.

तापमानात प्रत्येक एक डिग्री सेल्सिअसच्या वाढीमागे गर्भधारणेदरम्यान होणारा मधुमेहाचा धोका अंदाजे ६ टक्क्यांनी वाढतो.

निर्जलीकरणामुळे गर्भवतींमध्ये अम्नीओटिक द्रवपदार्थ कमी होऊ शकतो.

उच्च तापमानामुळे गर्भाशयाला आणि त्यामुळे गर्भाला होणारा रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे बाळा

ला ऑक्सिजन आणि पोषण कमी होते.

उपाययोजना

  1. अतिउष्णतेच्या परिस्थितीत शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण असणे गरजेचे आहे. त्यासाठी तहान लागली नसली तरीही जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे.

  2. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.

  3. ताजे व हलके अन्न खाऊनच घराबाहेर पडावे.

  4. फळे आणि सलाडसारखे पचायला हलके असणारे अन्न खावे.

  5. सैल, सुती, आरामदायी शक्यतो फिकट रंगाचे कपडे परिधान करावे.

  6. उन्हात बाहेर जाताना डोके झाकावे.

  7. भरपूर पाणी, ओआरएस पाण्याचे द्रावण, ताक किंवा लस्सी, लिंबूपाणी, कैरीचे पन्हे इत्यादी घरगुती पेय घ्यावे.

  8. थोडेसे मीठ घालून फळांचा रस घ्यावा.

  9. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर, इतर स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यांसारख्या उच्च पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

धक्‍क्‍यांच्‍या विस्‍ताराचा प्रस्‍ताव नाही! 'एमपीए'चे 'एनजीटी'ला पत्र; 11 दशलक्ष टनांपर्यंतच कोळसा हाताळणी

खरी कुजबुज: सुभाष यांचा कुंकळ्ळीत वाढला वावर!

VIDEO: "विराटने आणि मी आधीच ठरवलं होतं..." रोहित शर्माचा निवृत्तीबाबत मोठा खुलासा, पाहा नेमकं काय म्हणाला 'हिटमॅन'

SCROLL FOR NEXT