Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan: 'पुन्हा समन्स आल्यास कोर्टात जाणार'! चौकशीच्या नावाखाली सतावणूक होत असल्याचा पालेकरांचा आरोप

Amit Palekar Inquiry: संशयित सुलेमान खान याच्या पलायनप्रकरणाच्या चौकशीसाठी जुने गोवे पोलिसांनी ॲड. पालेकर यांना चौथ्यांदा समन्स बजावले होते.

Sameer Panditrao

पणजी: पोलिस कोठडीतून पलायन केलेल्या संशयित सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याच्या पहिल्या व्हिडिओसंदर्भातच्या चौकशीसाठी शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) चौथ्यांदा ‘आप’चे अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांची जुने गोवे पोलिसांनी दोन तास चौकशी करून जबानी नोंदवली.

समन्स साक्षीदाराला नव्हे तर गुन्ह्यातील संशयिताला पाठवले जाते. चौकशीच्या नावाखाली ही सतावणूक आहे. पुन्हा पोलिसांनी समन्स पाठवून चौकशीस बोलावल्यास त्याविरुद्ध उच्च न्यायालयात जाऊ व या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र तपास यंत्रणेकडे देण्याची मागणी करू, असा इशारा पालेकर यांनी पोलिस यंत्रणेला दिला.

संशयित सुलेमान खान याच्या पलायनप्रकरणाच्या चौकशीसाठी जुने गोवे पोलिसांनी ॲड. पालेकर यांना चौथ्यांदा समन्स बजावले होते. त्यानुसार आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पोलिस स्थानकात हजर झाले. सुमारे दोन तास त्यांची चौकशी व जबानी नोंदवण्यात येत होती. जबानी देऊन आल्यानंतर पालेकर म्हणाले की, नेहमीचेच प्रश्‍न व तिच उत्तरे देण्यात आली.

कोठडीतून फरारी झाल्यानंतर सुलेमानचा पहिला व्हिडिओ माझ्याकडे कसा पोहचला हाच प्रश्‍न ते वारंवार विचारत आहेत. मात्र त्या व्हिडिओत त्याने जमीन हडप एसआयटीच्या ज्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध आरोप केले आहेत, त्यांना चौकशीसाठी आजपर्यंत बोलावले नाही, असा आरोप त्यांनी केला.

भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५(३) खाली गुन्ह्यातील संशयित किंवा संशय असलेल्या व्यक्तीला पाठवण्यात येते. सुलेमान याने क्राईम ब्रँचच्या अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षकांवर आरोप केले आहेत. मात्र, त्यांना अजून एकदाही जुने गोवे पोलिसांनी समन्स पाठवले नाही. त्याऐवजी मला ते पाठवत आहेत. माझ्यावर त्यामध्ये काही आरोप नाही त्यामुळे पोलिस हे समन्स कसे काय पाठवू शकतात, असा प्रश्‍न पालेकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT