Accused Suleman Khan And Police Constable Amit Naik Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan: 'सुलेमान'च्या दुसऱ्या व्हिडिओचा उलगडा कधी ? पोलिस, एसआयटीचा तपास मंदावला

Suleman Khan Arrest Case: सुलेमान एसआयटी पोलिसांच्या ताब्यात असताना पळाला होता. त्यामुळे अर्धवट राहिलेल्या चौकशीसाठी त्याला पुन्हा न्यायालयाकडून परवानगी घेऊन ताब्यात घेण्यात येणार आहे.

Sameer Panditrao

Suleman Khan Escape Case Viral Video Investigation

पणजी: जमीन हडप प्रकरणातील मास्टरमाईंड तसेच पोलिस कोठडीतून पलायन केलेला संशयित सुलेमान खान ऊर्फ सिद्दीकी याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्याने जुने गोवे पोलिस तसेच एसआयटीचा तपास मंदावला आहे.

सुलेमान एसआयटी पोलिसांच्या ताब्यात असताना पळाला होता. त्यामुळे अर्धवट राहिलेल्या चौकशीसाठी त्याला पुन्हा न्यायालयाकडून परवानगी घेऊन ताब्यात घेण्यात येणार आहे. सध्या पोलिस नववर्ष तसेच झेव्हियर शवप्रदर्शनानिमित्त बंदोबस्तात व्यस्त असल्याने या प्रकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे.

सुलेमान हा पलायनप्रकरणी तसेच त्याची पत्नी जमीन हडपप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे त्या दोघांची चौकशी पोलिसांना करता येत नाही. दोघांनीही अद्याप जामिनासाठी अर्ज केलेला नाही. इतर जमीन हडप प्रकरणांमधील अनेक संशयित जामिनावर सुटले आहेत. या मुद्यावर सुलेमान आणि त्याच्या पत्नीने जामिनासाठी अर्ज केल्यास त्यांनाही तो मंजूर होऊ शकतो.

दुसऱ्या व्हिडिओच्या चौकशीचे काय?

पलायनानंतर सुलेमानचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले होते. मात्र, दुसऱ्या व्हिडिओप्रकरणी पोलिसांनी अद्याप काहीच हालचाल केलेली नाही. त्यामुळे त्याची सखोल चौकशी होण्याऐवजी पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. हे दोन्ही व्हिडिओ सुलेमानला काढण्यास कोणी भाग पाडले की, त्याने स्वतःच काढून ते व्हायरल केले, याचा उलगडा अद्याप पोलिसांनी केलेला नाही.

शस्त्र जप्त करण्यात पोलिसांना अपयश

सुलेमानची न्यायालयीन कोठडीत रवानगी होण्यापूर्वी त्याच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. अमितला हुबळी येथे पोहचल्यावर शस्त्र दाखवून धमकावल्याचा आरोप सुलेमानवर ठेवला आहे. मात्र, हे शस्त्र जप्त करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

Goa Amar Bandekar Case: किरकोळ कारणावरून हत्या, आता न्यायालयात हिशेब! तिघांविरुद्ध खुनाचा खटला चालणार, दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

IPL 2026: Believe Mumbai Indians! 'हिटमॅन'च्या मुंबई इंडियन्सला अजूनही प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी; 'असा' आहे क्वालिफिकेशनचा फॉर्म्युला

SCROLL FOR NEXT