Amit Palekar Interrogation Dainik Gomantak
गोवा

Suleman khan Case: सुलेमान खान प्रकरणात अमित पालेकरांना अटक होणार?

Amit Palekar Interrogation Update: आपचे अध्यक्ष अमित पालेकर यांनी काही दिवसांपूर्वी सुलेमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल केला होता

Akshata Chhatre

जुने गोवे: जमीन हडप प्रकरणातील अट्टल आरोपी सुलेमान खान हा पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती ,मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी (२३ डिसेंबर) माध्यमांना दिली. दरम्यान सुलेमान खान व्हिडीओ प्रकरणात गोवा पोलिस अमित पालेकर यांची ३ तासांहून अधिक काळ चौकशी करत होते. आपचे अध्यक्ष अमित पालेकर यांनी काही दिवसांपूर्वी सुलेमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल केला होता आणि त्याच व्हिडीओला धरून गोवा पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते.

ही चौकशी ३ तासांपर्यंत चालली आणि त्यानंतर आपचे नेते अमित पालेकर यांनी संबंधित माहिती माध्यमांना दिली. अमित पालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्यांना सुलेमान खानने हा व्हिडीओ फक्त तुम्हालाच का पाठवला? तुम्हाला हा व्हिडीओ नेमका कुठून मिळाला असे प्रश्न केले.

सुलेमान खान याची अटक आणि अमित पालेकर यांची चौकशी यांमध्ये एवढं साम्य कसं असू शकतं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सुलेमान खान हा गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीरपणे पोलिसांच्या ताब्यात आहे मात्र याची माहिती कोणालाही दिली गेलेली नाही. सुलेमान खानला मदत करणाऱ्याचा जमीन मंजूर करणं आणि विरोधी पक्षांना या प्रकरणात खेचून आणणं हे सपशेल चूक असल्याचा दावा पालेकरांनी केलाय.

"हा त्रास जर का असाच सुरु राहिला तर मी उच्च न्यायालयात जायला देखील मागे बघणार नाही आणि एखादा मुद्दा मांडण्यासाठी मला सुलेमानची गरज नाही" असा थेट इशारा आपच्या अध्यक्षांनी दिलाय. "गोव्यात जमीन हडप प्रकरणं सरकारला पुरेपूर माहिती आहे मात्र यावर कारवाई केली जात नाही. मला अटक करायची असेल तर नक्कीच करावी" असं म्हणत पालेकरांनी प्रकरणात सामील सर्वांच्या चौकशीची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: राज्यात पावसाचा लपंडाव सुरूच! जोरदार सरींनंतर आता पुढील 48 तासांत पावसाची गती मंदावणार

Goa Live News: केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून २०२५ पर्यंत गोव्यात १६२ कोटी रुपयांचे डिजिटल पेमेंट

Cricketer Retirement: क्रिकेट विश्वात एकच खळबळ! 'या' मॅचविनर ऑलराउंडरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

Goa Tenant verification: भाडेकरू, पर्यटक पडताळणी हवीच; दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी

Goa Politics: 'सभापती सरकारच्या हातचे बाहुले' सरदेसाईंच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध; अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप करू नयेत, फळदेसाईंचा सल्ला

SCROLL FOR NEXT