Amit Naik Dainik Gomantak
गोवा

Amit Naik: सुलेमान खानला मदत करणाऱ्या अमित नाईकला कोर्टाचा दणका; न्यायालयीन कोठडीत रवानगी

Amit Naik in judicial custody: सुलेमानच्या व्हिडिओमुळे फरार प्रकरणात अनेकांची नावे गुंतल्याचा आरोप केला जात आहे.

Pramod Yadav

पणजी: आरोपी सुलेमान खानला कोठडीतून बाहेर काढण्यास मदत करणाऱ्या बडतर्फ आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईकची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. अमितची म्हापसा जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

जमीन हडप प्रकरणातील मास्टर माईंड सुलेमान खान याला गुन्हे शाखेच्या कोठडीतून फरार करण्यास मदत करणाऱ्या आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक हुबळीत पोलिसांना शरण आला. नाईकला गोव्यात आणल्यानंतर पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. नाईक ओल्ड गोवा पोलिसांच्या लॉकअपमध्ये होता. दरम्यान, आज त्याला म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले असता त्याची रवानागी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सुलेमान खानला कोठडीतून बाहेर काढण्यासाठी अमित नाईकने तीन कोटी रुपयांत सौदा केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी अद्याप खात्रीशीर माहिती समोर आली नसली तरी, पोलिस याप्रकरणात अधिक तपास करत आहेत.

दुसरीकडे सुलेमान खानने जारी केलेल्या व्हिडिओत त्याला १० ते १२ पोलिसांनी हुबळीत सोडल्याचा आरोप केला आहे. शिवाय एका विद्यमान आमदाराने त्रास दिल्याचा उल्लेखही त्याने केलाय, सुलेमानच्या या व्हिडिओमुळे अनेकांची नावे यात गुंतल्याचा आरोप केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT