Bicholim Deputy Mayor Sukhada Teli Dainik Gomantak
गोवा

डिचोलीच्या उपनगराध्यक्षपदी सुखदा तेली बिनविरोध

रिक्त पदासाठी एकमेव अर्ज आल्याने पालिका मंडळाच्या बैठकीत निवड

Tukaram Sawant

डिचोली : डिचोली पालिकेच्या रिक्त उपनगराध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे सुखदा कमलाकर तेली यांची निवड झाली आहे. आज (शुक्रवारी) झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत त्यांची बिनविरोध निवड झाली. (Bicholim Deputy Mayor Sukhada Teli)

अर्ज भरण्याच्या कालच्या मुदतीपर्यंत सुखदा तेली यांनी एकटीनेच उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला होता. निर्वाचन अधिकारी दीपक वायंगणकर यांनी हा अर्ज ग्राह्य धरून सौ. तेली यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. यावेळी डिचोली पालिकेचे मुख्याधिकारी क्लेन मदेरा यावेळी उपस्थित होते.

सहा नगरसेवक अनुपस्थित

उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी आज बोलाविण्यात आलेल्या बैठकीस मावळत्या उपनगराध्यक्ष तनुजा गावकर यांच्यासह राजाराम गावकर, रियाज बेग दीपा शिरगावकर, ऍड. अपर्णा फोगेरी आणि गुंजन कोरगावकर हे सहा नगरसेवक अनुपस्थित होते. तर नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्यासह आठ नगरसेवक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lepidagathis Clavata: म्हादई खोऱ्यातल्या चोर्ला घाटानंतर 166 वर्षांनी फुललेली वनस्पती, 2024 मध्ये आढळली आंबोली परिसरात

Taleigao: वांगी, आंबा, तांदूळ, काजू बोंडेसाठी GI दर्जा मिळालेले; विशिष्ट मातीच्या गुणधर्माचे 'ताळगाव'

Goa Budget: विकासकामांचा धडाका, आश्वासनांची 99% अंमलबजावणी सुरू; फेब्रुवारीत गोव्याचा अर्थसंकल्प येणार?

Goa Third District: तिसरा जिल्हा झाला; पण 'रविं'चे स्वप्न पूर्ण झाले?

Kushavati District Goa: तिसऱ्या जिल्ह्यावरून वाद थांबेना! ‘कुशावती’चे मुख्यालय केपे नको; काणकोणवासीयांचे मत

SCROLL FOR NEXT