Crime

 

Dainik Gomantak 

गोवा

डिचोलीत विवाहित युवकाची गळफास लावून आत्महत्या

सर्वत्र नव वर्षाच्या स्वागताची धामधूम पसरली असतानाच, डिचोलीत (Bicholim) एका 34 वर्षीय विवाहित युवकाने आत्महत्या करण्याची घटना घडली आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: सर्वत्र नव वर्षाच्या स्वागताची धामधूम पसरली असतानाच, डिचोलीत एका 34 वर्षीय विवाहित युवकाने आत्महत्या करण्याची घटना घडली आहे. मयत युवकाचे नाव मुक्ता प्रभाकर डिचोलकर असे असून, तो गावकरवाडा-डिचोली (Bicholim) येथील रहिवासी होता. मुक्ता याने शहराबाहेर न्यू वाडा-वाठादेव परिसरात शुक्रवारी दुपारी त्याने झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

मुक्ता याने आत्महत्या का केली त्याचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी गेल्या काही दिवसांपासून त्याची मनस्थिती ठिक नव्हती. अशी माहिती मिळाली आहे. मयत मुक्ता हा वीज खात्यात नोकरीला होता. त्याच्या मागे पत्नी आणि एक लहान मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे. डिचोली पोलिसांना (Bicholim Police) घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: हरमलमध्ये खळबळ: गेस्ट हाऊसमध्ये आढळला परदेशी नागरिकाचा कुजलेला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु

IndiGo Crisis: 'प्रवाशांना रविवारी रात्रीपर्यंत रिफंड द्या', केंद्र सरकारचा 'इंडिगो 'ला आदेश; अन्यथा कारवाईचा इशारा

VIDEO: विकेट मिळताच जल्लोष असा की...: विराट कोहली आणि कुलदीप यादवचा LIVE सामन्यातील 'कपल डान्स' VIRAL!

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

Lonavala Accident: लोणावळ्यात भीषण अपघात..! अनियंत्रित कारची ट्रकला धडक, गोव्यातल्या दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT