Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

पंचायत निवडणुकीनंतर नव्याने भूमिगत वीजवाहिनीची निविदा

90 कोटी रुपयांचे तरतूद: वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात भूमिगत वीजवाहिनी घालण्याचे काम सुरू झाले होते. परंतु, ही वाहिनी घालण्याचा खर्च 30 ते 40 टक्क्यांनी वाढल्याने कंत्राटदार काम करत नाही. पंचायत निवडणुका झाल्यानंतर नव्याने निविदा काढण्यात येतील, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज विधानसभेत दिली. हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फरेरा यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते.

साळगावचे आमदार केदार नाईक यांनी सांगितले की, आपल्या मतदारसंघात भूमिगत वीजवाहिनी घालण्याचे 90 कोटी रुपयांचे काम मंजूर झाले आहे. परंतु, कंत्राटदार काम सुरू करत नसल्याचे मंत्र्यांच्या नजरेस आणून दिले होते. यासंदर्भात ढवळीकर यांनी, ही समस्या संपूर्ण राज्यभरात असल्याचे सांगितले. पंचायत निवडणुकीनंतर याचे निवारण केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

ॲड. फरेरा यांनी हळदोणे वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार आणि येथे 150 ट्रान्सफॉर्मर एका कनिष्ठ अभियंत्याच्या निरीक्षणाखील येतात. तसेच, कर्मचाऱ्यांना अभाव असल्याने पुरवठा सुरळीत करताना वेळ जातो. त्यासाठी अतिरिक्त अभियंता आणि कर्मचाऱ्यांची मागणी त्यांनी केली होती. ही मागणी मंत्र्यांनी मान्य केली.

शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो म्हणाल्या की, शिवोली मतदारसंघाला वीज उपकेंद्र म्हापशाचे होते. परंतु, आता ते पेडणेचे दिले आहे. त्यामुळे पुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचारी पेडणेतील काम पूर्ण करून अखेर शिवोली येथे येतात. त्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा म्हापसा उपकेंद्र द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर विचार करू, अशी ग्वाही ढवळीकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT