Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate: 'मोन्सेरात यांचा पोलीस काराभरात हस्तक्षेप असायचा, त्यामुळे....'; पोलीस उपअधीक्षकांची न्यायालयात साक्ष

बाबुश मोन्सेरात यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे पोलिसांकडे त्यांचे संबंध ताणले

गोमन्तक डिजिटल टीम

"2008 साली बाबूश मोन्सेरात हे सरकारच्या विरोधात होते आणि त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांच पोलीसांच्या कारभारात सतत हस्तक्षेप चालू असायचा, त्यामुळेच पणजी पोलिसांशी त्यांचे संबंध ताणलेले होते," अशी साक्ष पणजीचे तत्कालीन निरीक्षक आणि सध्याचे उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी दिली.

आजच्या सुनावणीस बाबूश आणि त्यांची पत्नी जेनीफर मोन्सेरात हे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे होते. मात्र माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज आणि उदय मडकईकर हे गैर उपस्थित होते. आपण निरीक्षक असताना वेगवेगळ्या प्रकरणात आपण मोन्सेरात यांच्या समर्थकांना अटक केली होती असेही नाईक यांनी सांगीतले.

19 फेब्रुवारी 2008 रोजी हा कथित हल्ला झाला होता. बाबूश मोन्सेरात यांच्या काही समर्थकांना अटक केली होती. त्यांना सोडवा अशी मागणी करण्यासाठी बाबूश मोन्सेरात आणि त्यांचे समर्थक पोलीस स्थानकावर चाल करून आले होते.

नाईक यांची तपासणी अर्धवट राहिल्याने आता ती 17 मार्चलापुढे चालू राहणार आहे. 17 मार्च रोजी बाबूश मोन्सेरात यांच्या विरुद्धच्या अल्पवयीन बलात्कार प्रकरणाचीही सुनावणी होणार आहे.

मोव्हीन गुदीन्हो प्रकरणाची सुनावणीही तहकूब

पंचायत मंत्री मोव्हीन गुदीन्हो यांच्या विरुद्ध चालू असलेल्या विज बिल सवलत घोटाळा प्रकरणाची आजची सुनावणी पुन्हा एकदा साक्षीदार नसल्याने पुढे ढकलण्यात आली. आता ही सुनावणीही 17 मार्च रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT