Sudip Tamhankar Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: जीटीडीसी आणि गोवा टुरिझमनं राज्यातील व्यवसाय संपवले; सुदीप ताम्हणकरांची घणाघाती टीका

Goa Tourism Business Shutdown: जीटीडीसी आणि गोवा टुरिझमने गोव्यातील व्यवसाय संपवल्याची घणाघाती टीका सुदीप ताम्हणकर यांनी केली.

Manish Jadhav

राज्यात सध्या दूधसागर पर्यटन हंगामाच्या मुद्यावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. काल (29 ऑक्टोबर) सत्ताधारी भाजपमधील दोन नेते दूधसागर पर्यटन हंगामाच्या मुद्यावरुन आमनेसामने आले. दूधसागर असोसिएशनचा वाद मिटवण्यात स्थानिक आमदार आणि जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर अपयशी ठरल्याचा घणाघात सावर्डे भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई यांनी केला. यावरच आता जीटीडीसी आणि गोवा टुरिझमने गोव्यातील व्यवसाय संपवल्याची टीका सुदीप ताम्हणकर यांनी केली.

ताम्हणकरांचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांनी दूधसागर जीप टूर ऑपरेटर्सची भेट घेतली आणि त्यांना GTDC सह पर्यटन सुरु करण्यास सांगितले. एवढचं नाहीतर कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास महिन्याभरात जीटीडीसी काउंटर बंद करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. या सगळ्यावर ताम्हणकर यांनी हे टीकास्त्र डागलं. ताम्हणकर म्हणाले की, ''मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि स्थानिक आमदार गणेश गावंकर यांनी तात्काळ हा वाद मिटवून पर्यटन हंगामास सुरुवात करावी.''

पूर्णवेळ पर्यटन रोजगार देण्याचे प्रयत्न

दूधसागर तसेच इतर परिसरात पर्यटनाच्यादृष्टीने कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि हितासाठी अनेक निर्णय घेतले असून पर्यटनात वृद्धी व्हावी यासाठी सरकार कार्यरत आहे. त्यामुळे कुणीही चुकीची विधाने करुन येथील टूर ऑपरेटर तसेच तत्सम घटकांमध्ये संभ्रम निर्माण करु नये याकडे लक्ष ठेवावे, असे आमदार गणेश गावकर यापूर्वी म्हणाले होते. शेवटी पूर्णवेळ पर्यटन रोजगार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून भाजप सरकार त्यासाठी सक्षम असल्याचेही गावकर म्हणाले होते.

जीटीडीसीचा हस्तक्षेप नको

दूधसागर धबधबा (Dudhsagar Waterfall) पर्यटन व्यवसायाची वेबसाईट आहे, ती आमची वेबसाईट आम्हांला परत द्यावी. या ठिकाणी जीटीडीसीचा हस्तक्षेप नको. सरकारला जो काही कर आहे, तो आम्ही भरण्यास तयार आहे, असे जीप टूर ऑपरेटर्सनी सांगितले. आम्हांला जीटीडीसीचा हस्तक्षेप नको, आम्हांला आपण सहकार्य करावे, अशी मागणी अध्यक्ष नीलेश वेळीप आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Match Fixing: क्रिकेट विश्वात मोठा भूकंप! टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटकडून चौकशी सुरु

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

SCROLL FOR NEXT