Dudhsagar waterfall Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar: मुसळधार पावसाने 'दूधसागर'च्या पाणी पातळीत वाढ; 40 पर्यटक बचावले

जीवरक्षकांनी संकट ओळखत केली सुटका

दैनिक गोमन्तक

राज्यात गेले काही दिवस मान्सून मंदावला असला तरी आज साखळी, डिचोली, सत्तरी भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाने कुळे, दूधसागर नदी आणि धबधब्याच्या पाणी पातळीतही वेगाने वाढल्याने पर्यटनासाठी आलेले 40 हून अधिक पर्यटक अडकले होते. त्यांची आता सुटका झाली असुन सर्व पर्यटक सध्या सुखरुप आहेत.

(sudden rain Over in Dudhsagar waterfalls 40 rescued after crossing bridge overturned)

Dudhsagar waterfall

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज मोले महाविर अभयाअरण्यात गडगडाटसह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे कुळे दुधसागर नदीत तसेच परिसरातील ओहळात पाणी अचानक वाढल्याने ओहळातील लोखंडी साकव पाण्याच्या प्रवाहात पलटी झाले. त्यामुळे ट्रेकींग व धबधबा पाहण्यासाठी गेलेले 40 पर्यटक ओहळाच्या पलीकडे काहीवेळ अडकले होते. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहेे.

या भागात दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत असल्याने दुधसागर नदीत व ओहळात अचानक पाणी येते त्यामुळे पर्यटकांना भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागते. आज शुक्रवारी अशाच प्रकारे पाण्याचा वेग वाढल्याने पर्यटकांवर भयानक प्रसंग ओढवला होता. जीवरक्षकांना याची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी धाव घेत सर्वांना पाण्यातुन बाहेर काढले आहे. यावेळी जिवरक्षक निरज गांवकर, हनुमंत भजंत्री,मारुती ओटावडेकर,विठ्ठल मसुरकर व शनवाज नदाफ यांनी या सर्वांना सुखरुप बाहेर आणण्यास मदत केली.

पुढील पाच दिवस राज्यात तुरळक पावसाची शक्यता

राज्यात पुढील पाच दिवस तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे. या हंगामातला पाऊस संपण्याला अवघे सात-आठ दिवस उरले असून मान्सूनचा पाऊस मंदावला असून धुके आणि थंडीतला गारवा वाढू लागला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सरासरी पावसाची तूट वाढतच असूनआज ती 7.9 टक्के इतकी झाली आहे.गेल्या चार दिवसांपासून उघडीप दिलेल्या पाऊस आणखी 4 दिवस म्हणजे 25 सप्टेंबर पर्यंत असाच तुरळक स्वरूपात पडणार आहे, अशी माहिती वेधशाळेने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दाट धुक्यामुळे अंदाज चुकला, ट्रक पलटी होऊन दरीच्या टोकावर थांबला; दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले

Surya Grahan Astrology: 2 ऑगस्टला सूर्य ग्रहण पाळावं का? हिंदू पंचांगात दिलेली माहिती वाचा; ग्रहणाचे नियम व अटी जाणून घ्या

RORO Ferry Service: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खुशखबर! लवकरच सुरु होतेय मुंबई-सिंधुदुर्ग 'रो-रो'सेवा; किती पैसे मोजावे लागणार?

Goa Assembly Live: मुद्रण आणि स्टेशनरी विभागांतर्गत 5 डिजिटल उपक्रम सुरू

''हे तर दुबई-लंडनमध्येही नाही!' गोव्यातील 'डिजिटल ट्रायल रूम' पाहून ब्रिटिश थक्क; Watch Video

SCROLL FOR NEXT