Goa Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: टेक ऑफ नंतर प्रवाशाला वाटू लागले अस्वस्थ; मोपा विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग; पुढे काय घडले? सून्न करणारी घटना

Goa News: शारजाहून कोचीनला निघालेल्या एअर अरेबियाच्या विमानात एका ८४ वर्षीय व्यक्तीचा अचानक मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa International Airport, Goa

मोपा: गोव्यातील मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर आज (दि. २७ ऑक्टोबर) एक धक्कादायक घटना घडली. शारजाहून कोचीनला निघालेल्या एअर अरेबियाच्या विमानात एका ८४ वर्षीय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण तयार झाले होते.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वैमानिकांनी त्वरित आरोग्यसंबंधित आणीबाणी घोषित केली. ८४ वर्षीय या व्यक्तीची तपासणी करण्यासाठी विमान उत्तर गोव्यातील मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आले.

केरळमधील कोट्टायम येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीवर नुकतीच हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि वयोमानासंबंधित मृत्यूचे करण जाहीर करून गोवा पोलिसांनी व्यक्ती मृत असल्याची घोषणा केली. जोसेफ उलाहन्नन नावाच्या या प्रवाशाने विमानात प्रवास करीत असताना शारीरिक अस्वस्थतेची तक्रार केली आणि वेळ न दवडता एअर अरेबियाच्या फ्लाइटच्या क्रूने हे विमान गोव्याला वळवण्याचा निर्णय घेतला होता.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने केरळमधील या प्रवाशाचा मृत्यू नैसर्गिक असल्याची पुष्टी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला आणि त्यांनतर विमानेने आपल्या गंतव्यस्थानाकडे उड्डाण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT