Yoga  Dainik Gomantak
गोवा

अखिल गोवा योगासन स्पर्धेत अभिनव कुमार पांडे याचे सुयश

ॐ नित्य दिव्य योगाश्रमतर्फे परमपूज्य श्री ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केले

दैनिक गोमन्तक

वास्को: कसमशेळ, बेतोडा - फोंडा येथील ल्या अखिल गोवा योगासन स्पर्धेत 16 ते 25 वर्षे कुमार गटात हेडलॅण्ड - सडा येथील दीपविहार उच्च माध्यमिक हायस्कूलच्या अभिनव कुमार पांडे याने सुयश प्राप्त केले. या कामगिरीबद्दल हायस्कूलच्या शिक्षक वर्गातर्फे तसेच सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

अभिनव कुमार पांडे हा हेडलॅण्ड - सडा येथील दीपविहार उच्च माध्यमिक हायस्कूलचा अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून शिक्षणाबरोबर त्याने सूर्यनमस्कार, योगा व इतर क्रीडा प्रकारात पारंगतता दाखवून अनेक बक्षिसांना गवसनी घातली आहे. यात राज्यस्तरीय योगासन, सूर्यनमस्कार स्पर्धेत त्याने भाग घेऊन अनेक बक्षिसे प्राप्त केली आहेत. तसेच राष्ट्रीय पातळीवर पंजाब येथे झालेल्या योगा स्पर्धेत भाग घेऊन आपली चमक दाखविली आहे.

दरम्यान, बेतोडा - फोंडा येथे ॐ नित्य दिव्य योग आश्रमतर्फे आयोजित अखिल गोवा योगासन स्पर्धेत 16 ते 25 वर्षे कुमार गटात अभिनव कुमार पांडे याने प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले. त्याला ॐ नित्य दिव्य योगाश्रमाचे गुरुवर्य ईश्वर कुबल यांच्या हस्ते ‘योग कुमार 2022’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT