Subhash Velingkar Case Dainik Gomantak
गोवा

Subhash Velingkar Case: सुभाष वेलिंगकरांना मोठा झटका! कोर्टाने फेटाळला सशर्त अटकपूर्व जामीन

Manish Jadhav

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या सुभाष वेलिंगकरांना पणजी पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने वेलिंगकरांचा सशर्त अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. वेलिंगकरांनी शनिवारी अटकपूर्व जामिनासाठी पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, अतिरिक्त सत्र न्यायाधीश बॉस्को रॉबर्ट्स यांनी वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. एवढचं नाहीतर वेलिंगकरांना पोलिसांसमक्ष हजर राहण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले.

दरम्यान, वेलिंगकरांच्या अटकपूर्व जामीनावर आज (7 ऑक्टोबर) सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान वेलिंगकरांच्या वकिलाने, 'वेलिंगकर तपास अधिकाऱ्यासमोर हजर होण्याचा धोका पत्करु शकत नाहीत. लोकांच्या दबावाखाली त्यांना पोलीस अटक करतील. ही लोकशाही नाही झुंडशाही आहे असे म्हटले होते. त्यांनी काही गुन्हा केला नाही तर डीएनए टेस्ट करावी ही केवळ मागणी असल्याचे देखील ते पुढे म्हणाले होते. त्यावर प्रतिवादी पक्षाच्या वकिलांनी 'वेलिंगकरांना सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करुन गोव्यातील सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याचे काम केले आहे,' असा युक्तिवाद केला होता. तसेच, डिचोली पोलिसांनीही वेलिंगकरांना जामीन नाकारण्यात यावा असा युक्तिवाद केला.

तियात्रिस्त समुदायाकडून वेलिंगकरांच्या अटकेची मागणी

गोव्यातील तियात्रिस्त समुदायाकडूनही आता वेलिंगकरांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. सुभाष वेलिंगकर यांनी सेंट झेवियर यांच्याबाबत केलेली टिप्पणी ही निंदनीय आहे, तरीही वेलिंगकरांना वेळेत अटक करण्यात सावंत सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. तियात्रिस्त समुदायाच्या मते, राज्य सरकारची ही वागणूक केवळ राज्यातील जनतेमध्ये फूट पाडण्यासाठी आखली गेली आहे. आम्ही गोव्याच्या पोलिस महासंचालकांना लवकरात लवकर सुभाष वेलिंगकर यांना अटक करावी अशी मागणी करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्याला परतीच्या पावसाचा दणका; सत्तरी, डिचोलीत बत्ती गुल!

St. Francis Xavier DNA Test Row: ''वेलिंगकरांना अटक केल्यास...''; हिंदू संघटनांचा इशारा

Mount Kailash Mystery: '...पण माणूस रहस्यमयी कैलास पर्वतावर चढाई करु शकला नाही'!

Israel-Iran War Impact: तणाव इराण-इस्त्रायलमध्ये, झळ भारताला; तेलाच्या सर्वात मोठ्या आयातदाराची वाढली चिंता!

Subhash Velingkar Case: सुभाष वेलिंगकरांना अटक करा!! आता थेट परदेशातून आंदोलकांची मागणी

SCROLL FOR NEXT