Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

मंदिर पुनर्बांधणी समिती : RSS च्या माजी पदाधिकाऱ्यांनं सावंत सरकारला फटकारलं, म्हणाले..

मंदिरांच्या पुनर्बांधणीच्या निर्णयावर सरकारला फटकारले

गोमन्तक डिजिटल टीम

Sancoale: पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या गोव्यातील मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठीच्या स्थळांची शिफारस करण्यासाठी सरकारने पाचजणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावर सुभाष वेलिंगकर यांनी टिका करत सरकारला फटकारले आहे.

वेलिंगकर म्हणाले, "मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठीच्या निर्णयाचे स्वागत करतो. मंदिरे उध्वस्त करून पोर्तुगीजांनी चर्च बांधले. मंदिरांच्या पुनर्बांधणीबद्दल बोलण्यापेक्षा सरकारने आधी सांकवाळची संरक्षित वारसा स्थळ असलेली श्री विजयादुर्गा देवीच्या मंदीराची जमीन मोकळी करून द्यावी" अशी मागणी सरकारकडे केली आहे.

काही महिन्यांपूर्वी वेलिंगकर यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर भाष्य केले होते. ते म्हणाले होते, "पोर्तुगीजांनी गोव्यातील मंदिरे उध्वस्त करून चर्च बांधले. पोर्तुगीजांनी मंदिरे उध्वस्त करून चर्च न बांधलेल्या राज्यात आता फक्त दोनच जागा रिकामी आहेत."

"एक म्हणजे वेर्णा सासष्टी वरण्यपुरी येथील श्री महालसा मंदीर उध्वस्थ झालेले होते. पण तेथे हिंदु भावीकांनी मंदीर पुन्हा स्थापन केले. दुसरी म्हणजे सांकवाळची श्री विजयादुर्गा देवीचे मंदीर. या मंदीराच्या जागेवर गेली 10 वर्षे चर्च संस्थेकडून अतिक्रमण चालू आहे".

"पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या या जागेत बेकायदेशीर धंदे सुरु आहेत. याची दखल कोणीही घेत नाही आहे. मंदीरासमोरील तळंही उध्वस्थ करण्यात आले आहे. चर्च संस्थेकडून सरकारद्वारे वाममार्गाने दबाव आणून ही अवैध कामे करण्यात येत आहेत" असा सरकारवर त्यांनी आरोप केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT