Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

मराठी शाळा संपविण्याचा डाव : सुभाष वेलिंगकर

मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचाही इशारा

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील काही मराठी व कोकणी शाळांचे विलीनीकरण इतर शाळांमध्ये करण्याचा घाट सरकारने चालविला आहे. एकंदरीत मातृभाषेतील शाळा संपविण्याचा विडा सरकारने उचलला असल्याचे प्रतिपादन भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी केले.

सिदार्थ भवन पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रविण नेसवणकर, सुरेंद्र पाळणी व सुरेश डिचोलकर उपस्थित होते. वेलिंगकर पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत नव्या मराठी व कोकणी शाळांसाठी 200 हून अधिक अर्ज सरकारकडे पाठविण्यात आले. मात्र, एकाही शाळेला परवानगी देण्यात आलेली नाही. जर शाळांचे विलीनीकरण झाले, तर शिक्षणाच्या हक्काप्रमाणे 1 कि.मी. अंतरावर शाळा असावी ही तरतुद सरकार धुडकावत आहे. शाळांचे विलीनीकरण दुसऱ्या शाळांमध्ये करू नये, प्राचार्य माधव कामत अहवालाची अमंलबजावणी करावी, असेही प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे.

नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात अपयश

इतर राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झालेली आहे. मात्र, गोवा राज्य याबाबतही अपयशी ठरले आहे. पुढील वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अमंलबजावणी करणार असल्याचे सांगितले जात आहे.

माधव कामतांचा अहवाल पडून

मातृभाषेतील शाळांच्या संख्येत वृद्धी व्हावी. विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्राचार्य माधव कामत कमिटीद्वारे अहवाल मागविण्यात आला होता. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून कमिटीचा अहवाल धूळ खात पडला असून त्याची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचे सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT