Subhash Velingkar Case Dainik Gomantak
गोवा

Subhash Velingkar: 'गोवा राज्‍य जबाबदारी पाळण्‍यात अपयशी'; वेलिंगकर प्रकरणावरून 'दक्षिणायन'चे आरोप

St Francis Xavier Relics DNA Controversy: वास्‍तविक वेलिंगकर यांचे हे वक्‍तव्‍य द्वेष भडकवण्यासाठीच असल्‍याने राज्‍याने या घटनेची स्‍वत:हून दखल घेत वेलिंगकर यांच्‍या विरोधात त्‍वरित एफआयआर दाखल करून घेण्‍याची गरज होती असे मत दक्षिणायन संघटनेने व्‍यक्‍त केले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी गोवा प्रमुख, सुभाष वेलिंगकर यांचे सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या विरोधात केलेले अवमानकारक विधान हे गोव्यातील आत्तापर्यंतच्या सुसंवादी जीवनपद्धतीत जातीय विद्वेष निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया दक्षिणायन अभियान संघटनेने केला आहे.

वास्‍तविक वेलिंगकर यांचे हे वक्‍तव्‍य द्वेष भडकवण्यासाठीच असल्‍याने राज्‍याने या घटनेची स्‍वत:हून दखल घेत वेलिंगकर यांच्‍या विरोधात त्‍वरित एफआयआर दाखल करून घेण्‍याची गरज होती, असेही मत व्‍यक्‍त केले आहे.

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे माजी राज्‍य प्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्‍या या द्वेषमूलक वक्‍तव्‍याचा आम्‍ही निषेध करतो. त्‍यांनी गोव्यातील सामान्य जनतेची आणि विशेषतः भाविकांची जाहीर माफी मागावी अशी मागणी करतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोवा सरकारने दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. मुस्लीम फळ आणि भाजीपाला विक्रेत्यांवर बहिष्कार टाकण्याच्या हिंदुत्व संघटनेच्या आवाहनाचाही दक्षिणायन अभियान निषेध करते, असे मोहनदास लोलयेकर, ॲड. क्लिओफात आल्मेदा कुतिन्‍हो, दामोदर मावजो, प्रशांत नाईक, सत्येंद्र सोनार आणि दत्ता नायक यांनी संयुक्तरीत्या जारी केलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे.

प्राथमिक जबाबदारी पाळण्यात अपयश

वास्‍तविक अशा द्वेष पसरविणाऱ्या वक्‍तव्‍याविरोधात राज्‍य सरकारने सुमोटो (स्‍वत:हून) कारवाई करावी अशी सूचना सर्वोच्‍च न्‍यायालयानेही दिली आहे.

सर्व राज्‍यातील पोलिस महासंचालकांना तसे निर्देशही दिले आहेत.

राज्‍याने या बाबतीत स्‍वत:हून एफआयआर दाखल करण्‍याची गरज होती. मात्र, गोवा राज्‍य आपली ही प्राथमिक जबाबदारी पाळण्‍यात अपयशी ठरले.

चर्चची भूमिका महत्त्वाची

हे आंदोलन हाताबाहेर जाऊ नये यासाठी चर्चने जी भूमिका घेतली तीही वाखाणण्‍याजोगी होती. चर्चने लोकांना शांत राहण्‍याचे आवाहन करून रस्‍त्‍यावर येऊ नये असे आवाहन केल्‍यामुळेच लोक रस्‍त्‍यावर येण्‍यापासून परावृत्त झाले. त्‍यामुळे चर्चचे दक्षिणायन अभियानने अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

SCROLL FOR NEXT