Subhash Phaldesai Gomantak Digita Team
गोवा

Canacona News : शेतजमिनींचे रुपांतर रोखणे गरजेचे...

सुभाष फळदेसाई : नगर्से येथे कृषी उत्पन्न बाजार मंडळाच्या वास्तूचे भूमिपूजन

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण : शेतकरी हा आमचा पोषणकर्ता आहे. खनिजमालाला कृषीमालापेक्षा जास्त भाव मिळत असला तरी खनिजमाल पोटाची खळगी भरू शकत नाही. त्यासाठी आजच्या काळातही शेती हाच उत्तम पर्याय आहे. म्‍हणूनच शेतजमिनीचे होणारे रुपांतर थांबविण्याची गरज आहे, असे मत समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केले.

नगर्से-काणकोण येथे कृषी उत्पन्न बाजार मंडळाच्या वास्तूचे भूमिपूजन केल्‍यानंतर फळदेसाई बोलत होते. सुमारे साडेतीन कोटी रूपये खर्चून या वास्तूची उभारणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, जिल्हा पंचायत सदस्य शोभना वेळीप, शाणू वेळीप, सुवर्णा तेंडुलकर, समितीचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, संचालक दत्ता गावकर, लक्ष्मण वेळीप, भिकारो वेळीप, दुर्गादास देयकर, उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, कृषी खात्याचे संचालक नेविल आल्फोन्सो, ‘आत्मा’चे शिवराम नाईक गावकर व खोलाचे सरपंच अजय पागी उपस्थित होते.

कृषी संचालक आल्फोन्सो यांनी कृषीमाल प्रदेशात निर्यात करण्याच्या दृष्टीने राज्यात पॅक हाऊस उभारण्‍याचा खात्याचा विचार असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील कृषीमालाच्या विक्रीसाठी या प्रकल्पात खास‌ व्यवस्था करण्याची मागणी नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिरीष पै यांनी केले तर सत्यवान देसाई यांनी आभार मानले.

राज्यातील चार चेकनाक्यांवरून वर्षाकाठी कृषी मालाच्या आयातीतून मार्केटिंग बोर्डाला १३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. कृषी मालाचे दर मार्केटिंग बोर्ड ठरवतो हा काहींचा चुकीचा समज आहे. नगर्से-काणकोण येथील प्रकल्पात दुकाने, सभागृह व कार्यालय असेल. तसेच हा प्रकल्‍प सुसज्ज व अत्‍याधुनिक असेल.

प्रकाश वेळीप, समितीचे अध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT