Savitri Kavalekar Dainik Gomantak
गोवा

सावित्री कवळेकरांना उमेदवारी मिळणे अवघड; सुभाष फळदेसाईंचा दावा

मतदारसंघातील भाजपच्या कामांची सर्व मदार आपल्यावर आहे. तसेच सांगे मतदारसंघातील भाजप मंडळ, महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चा सर्व आपल्या पाठिशी आहे

दैनिक गोमन्तक

सासष्टी : सावित्री कवळेकर (Savitri Kavalekar) या सांगे मतदारसंघातील मतदार नाहीत. तसेच एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना उमेदवारी दिली जात नाही, भाजपच (BJP) धोरण आहे. त्‍यामुळे सांगेतून सावित्री कवळेकर यांना उमेदवारी मिळणे अवघड असल्‍याचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. मडगाव (Margao) येथे आयोजित पत्रकार परिषदेत फळदेसाई यांनी याबाबत स्‍पष्टीकरण दिले.

उपमुख्यमंत्री व केपेचे आमदार चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्या पत्नी आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) सांगे मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, सांगेचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. आपण सांगे मतदारसंघातील उमेदवारीसाठी प्रबळ उमेदवार आहे. मतदारसंघातील भाजपच्या कामांची सर्व मदार आपल्यावर आहे. तसेच सांगे मतदारसंघातील भाजप मंडळ, महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चा सर्व आपल्या पाठिशी आहे. जी व्यक्ती संघटनात्मक कार्य करते अशा व्यक्तीला उमेदवारी दिल्यास आपण त्याच्या मागे राहून विजयासाठी कार्य करणार असल्याचेही फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

सांगे मतदारसंघातील भाजपामध्ये कसलीही दुफळी नाही. मतप्रवाह वेगळे असले तरी नवनाथ नाईक हेसुद्धा पक्षाचे कार्य करतील, असा विश्र्वास सुभाष फळदेसाई यानी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, भारती नाईक, वैशाली नाईक, राजेश गावकर व प्रज्योत गावकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT