Subhash Faldesai esakal
गोवा

Subhash Faldesai : लोलये येथील भगवती पठारावर प्रदूषणविरहीत प्रकल्प उभारणार

फळदेसाई : आयआयटी, फिल्म सिटी, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा समावेश

गोमन्तक डिजिटल टीम

Subhash Faldesai : लोलये पंचायत क्षेत्रातील भगवती पठारावर ग्रीन प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे. सर्वांना विश्‍वासात घेऊनच हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे, असे समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

भगवती पठारावर आयआयटी, शिवाय फिल्म सिटी, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ तसेच अन्य प्रदूषणमुक्त प्रकल्पांचा विचार करण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे पर्यावरणाला अजिबात धोका पोहोचणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात येणार आहे. त्याशिवाय काणकोणमधील अस्तित्वात असलेल्या स्थानिक जल पुरवठ्यावर या प्रकल्पांचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे.

ही जमीन लोलये कोमुनिदाद मालकीची असून या जमिनीच्या वापरासंबंधी कोमुनिदादच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. भागीदारी तत्त्वावर हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. सरकार या प्रकल्पांसाठी निविदा जारी करणार आहे. त्यानंतर जे प्रकल्प सर्वाधिक महसूल देणार आहेत, त्या प्रकल्पांना सरकार मान्यता देणार असल्याचे सुभाष फळदेसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

...तर आयआयटी लोलयेतच

सांगे येथे आयआयटी प्रकल्पासाठी दुसरी जमीन पाहिली आहे. पहिल्यांदा पाहिलेली जमीन मृदा तपासणीनंतर योग्य नसल्याने केंद्र सरकारने त्या जमिनीला हिरवा कंदील दाखवला नाही. दुसऱ्या जागेलाही मान्यता न मिळाल्यास आयआयटी प्रकल्पासाठी लोलये येथील भगवती पठाराचा विचार करण्यात येणार आहे, अशी माहिती सुभाष फळदेसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT