Goa BJP Government  Dainik Gomantak
गोवा

भाजप चार दिवसांतच सरकार स्थापन करणार: सुभाष फळदेसाई

सावंत हेच मुख्यमंत्री: काँग्रेसचे आरोप वैफल्यग्रस्तेतून

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजप येत्या चार दिवसांत डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करणार आहोत, असे  सांगत काँग्रेस पक्ष सरकार स्थापनेच्या मुद्यावरून लोकांना भडकवत असून आम्ही त्यांचा निषेध करत आहे, असे सांग्याचे आमदार तथा भाजपचे प्रवक्ते सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार दाजी साळकर, गोविंद गावडे, नीळकंठ हळर्णकर उपस्थित होते.

आमदार फळदेसाई म्हणाले, सरकार स्थापनेच्या संदर्भामध्ये काँग्रेस बेछूट आरोप करत आहे. भाजप राष्ट्रीय पक्ष असून, पक्षाने चार राज्यांमध्ये ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. याशिवाय सध्या होळी आणि शिमग्याचे दिवस आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेला थोडा उशीर होत असला तरी स्थीर, भ्रष्टाचारमुक्त आणि चांगल्या प्रशासनाचे, लोकांचे सरकार येत्या चार दिवसांमध्ये स्थापन करण्यात येईल. यासाठीची सोपस्कर प्रक्रिया पूर्ण झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी हंगामी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे असून त्यांच्याच नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होईल.

भाजपमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. काँग्रेसला 2017 च्या निवडणुकीमध्ये 17 जागा जिंकूनसुद्धा सरकार स्थापन करता आले नव्हते. आता त्यांची संख्या 17 वरून 11 का झाली? त्याचे आत्मपरीक्षण कॉंग्रेसने करावे. भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली असून काँग्रेसची मात्र ती 26.90 वरून 23.50 इतकी घटली आहे याकडे काॅंग्रेसने लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

काँग्रेसमधील मतभेद उघड

मायकल लोबो यांनी दक्षिणेत काँग्रेसला कमी मते मिळाल्यामुळे कमी जागा निवडून आल्या असे दिगंबर कामत यांच्यासमोर मत मांडले आहे. लोबो यांचे हे मत काँग्रेस पक्षांतर्गत असलेले मतभेद उघड करते. सध्या काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष नाही याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असे फळदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

SCROLL FOR NEXT