National Service Scheme Dainik Gomantak
गोवा

National Service Scheme : विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा लाभ घ्यावा : दिलीप धारगळकर

National Service Scheme : ‘दीपविहार’मध्ये स्वयंसेवकांना मार्गदर्शन

गोमन्तक डिजिटल टीम

कुठ्ठाळी, राष्ट्रीय सेवा योजना ही केंद्र सरकारची योजना असून ती कोणत्याही पद्धतीत बंद पडणार नाही. ती युवांशी जोडलेली एक विशाल संघटना आहे.

शालेय जीवनात शिकत असताना शिबिरामध्ये सहभागी होऊन अनेक गोष्टी आत्मसात केल्या, त्याचा खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये मला खूप फायदा झाला. तेव्हा आजच्या विद्यार्थी पिढीने अशाप्रकारच्या योजनांचा भरपूर लाभ उठवून स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करावे, असे मत प्रा. दिलीप धारगळकर यांनी व्यक्त केले.

दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना प्रशिक्षण कार्यक्रमात ते स्वयंसेवकांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य मारिया डायस, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. सुनील शेट, कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकांत पालसरकर, किरण सैल उपस्थित होते.

प्राचार्य मारिया डायस म्हणाल्या, की विद्यार्थ्यांनी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या शिस्तबद्धरित्या आत्मसात करून स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करावे.

प्रा. श्रीकांत पालसरकर यांनी प्रमुख पाहुणे प्रा. दिलीप धारगळकर यांचा परिचय करून दिला. प्रा. सुनील शेट यांनी स्वागत करून कार्यक्रम आयोजनाचा हेतू विशद केला. प्राचार्य मारिया डायस यांनी प्रा. दिलीप धारगळकर यांना स्मृतीचिन्ह व भेटवस्तू प्रदान केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT