PratapSingh Rane
PratapSingh Rane Dainik Gomantak
गोवा

Parra News : विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे : प्रतापसिंह राणे

गोमन्तक डिजिटल टीम

Parra News :

पर्ये, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. या वैज्ञानिक युगात विद्यार्थ्यांनी बौद्धिक विकास करून जीवनात यश संपादन करावे, असे उद्‌गार श्री भूमिका शिक्षण संस्था पर्ये-सत्तरीचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे यांनी काढले.

पर्ये-सत्तरी येथील श्री भूमिका उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच झाला.

यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य यशवंत सावंत, उपप्राचार्य रावसाहेब राणे, व्यवस्थापक शिवाजीराव राणे सरदेसाई, सचिव कुष्ठा राणे, खजिनदार शंकर च्यारी व पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष विशांत आमोणकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष संतोष गावस यांनी केले तर अमर गावस यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांचा गौरव

यावेळी प्रमुख पाहुणे राणे यांच्या हस्ते प्रत्येक शाखेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

यात कला शाखेतून रिश्वा गावस, वाणिज्य शाखेतून निसा खान, विज्ञान शाखेतून कल्पेश चोर्लेकर तर व्यावसायिक शाखेतून अथर्व जोशी यांचा समावेश होता. तसेच उत्कृष्ट खेळाडू (मुलगा) कनन आचारी, उत्कृष्ट खेळाडू (मुलगी) वैष्णवी मांगेलकर यांनाही स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी एक जणाला अटक

NEET Exam: गोव्यातील चार हजार विद्यार्थ्यांवर अन्याय, ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेण्याची NSUI ची मागणी

Mining Transport: खनिज वाहतूकप्रश्‍नी सरकारला कानपिचक्या! कोर्टाने केल्या महत्वाच्या सूचना

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT