Goa Drugs Canva
गोवा

Goa Drugs Case: खळबळजनक! गोव्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत अंमली पदार्थ पुरवले जात असल्याचा दावा

Goa Crime News: राज्यातील शाळांमध्ये ‘एलएसडी’ सहजपणे सापडत असून पहिल्यांदा हे ड्रग्स विद्यार्थ्यांना मोफत पुरविले जाते. हे अमली पदार्थ स्टॅम्प आणि स्मायलीमधून लपवून दिले जात असल्याचा दावा स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे राज्य सचिव शेख अफताफ हुसेन यांनी केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील शाळांमध्ये ‘एलएसडी’ सहजपणे सापडत असून पहिल्यांदा हे ड्रग्स विद्यार्थ्यांना मोफत पुरविले जाते. हे अमली पदार्थ स्टॅम्प आणि स्मायलीमधून लपवून दिले जात असल्याचा दावा स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे राज्य सचिव शेख अफताफ हुसेन यांनी केला आहे.

ते पणजीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय कॅम्पस सचिव इम्रान हुसेन आणि कबीर खान उपस्थित होते. शेख म्हणाले, हे अमली पदार्थ जे पुरवितात, त्यांचा उद्देश पैसे कमावण्याचा नसून त्यांना शाळकरी मुलांना जाळ्यात लोटून गोव्याचे भविष्य धोक्यात घालण्याचा हा डाव असून यात सरकारने लक्ष घालावे.

मानांकनात घट!

गोवा विद्यापीठाची गणना ही देशातील सर्वांत चांगल्या १०० विद्यापीठांमध्ये केली जायची; परंतु आता मानांकनात घसरण झाली असून १५० विद्यापीठांमध्ये नोंद घेतली जात आहे. गोवा विद्यापीठ हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे, त्यांच्या मानांकनात अशा प्रकारे घट होणे, चिंताजनक असल्याचे इम्रान हुसेन यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

SCROLL FOR NEXT