Student fakes kidnapping Dainik Gomantak
गोवा

'..मला 3 बुरखाधारी व्यक्तींनी अडवले'! शिक्षक ओरडतील या भीतीपोटी विद्यार्थ्याने रचले अपहरणनाट्य; अभ्यासाच्या ताणामुळे केला बनाव

Mapusa Student Fake Kidnapping: सुरुवातीला दिलेल्या जबाबात संबंधित विद्यार्थ्याने, आपण नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना वाटेत तीन बुरखाधारी व्यक्तींनी अडवून तोंडावर पावडर फुंकल्याचा दावा केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: ‘असाइनमेंट’ पूर्ण न केल्याने शिक्षक ओरडतील, या भीतीपोटी म्हापशातील एका नामांकित शाळेतील नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या अपहरणाचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांच्या सखोल चौकशीअंती हा संपूर्ण प्रकार केवळ कल्पनाविलासातून रचल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घटना गुरुवारी (ता. १८ डिसेंबर) घडली.

सुरुवातीला दिलेल्या जबाबात संबंधित विद्यार्थ्याने, आपण नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना वाटेत तीन बुरखाधारी व्यक्तींनी अडवून तोंडावर पावडर फुंकल्याचा दावा केला होता. त्यानंतर घाबरून घटनास्थळावरून पळ काढला, भोवळ येऊन रस्त्याच्या कडेला पडून राहिलो आणि शुद्धीवर आल्यानंतर घराजवळील एका दुकानातून आई-वडिलांशी संपर्क साधल्याचेही त्याने सांगितले होते.

मात्र, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेज तपासणी तसेच विद्यार्थ्याची सखोल चौकशी केली असता हा अपहरणाचा प्रकार खोटा असल्याचे निष्पन्न झाले.

पालकांमध्ये चिंता

अभ्यासाचा ताण आणि ‘असाइनमेंट’ पूर्ण न केल्याची भीती यामधून सुटका मिळावी, या हेतूनेच विद्यार्थ्याने हा थरारक बनाव रचल्याची कबुली नंतर दिली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांवरील वाढता अभ्यासाचा ताण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP Election: लेकीचे पहिले मतदान, वडिलांना 'विजयाचा' विश्वास! CM सावंतांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Dabolim: लोकांच्या जीवाशी खेळ! उड्डाण पुलाच्या कामामुळे चालकांना धोका, वास्कोत नियमांची ऐशीतैशी; सळ्यांची धोकादायक वाहतूक

Vijay Merchant Trophy 2025: गोव्याची एक डाव, 152 धावांनी हार! दुसऱ्याच दिवशी पराभव; सलग तिसऱ्यांदा हाराकिरी

Goa Live News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Goa ZP Election: पंचायत मंत्री माविन गुदिन्होंनी बजावला मतदानाचा हक्क! म्हणाले, 'हा लोकशाहीचा उत्सव'

SCROLL FOR NEXT