Sonarbag Bandhara Protest: Dainik Gomantak
गोवा

सोनारबाग बंधाऱ्याला स्थानिकांचा तीव्र विरोध; महिलांनी रस्त्यावरच मांडले ठाण

मुर्डी-खांडेपार भागात तणाव

दैनिक गोमन्तक डिजिटल

Sonarbag Bandhara Protest: बंधारा बांधण्यावरून सोनारबाग, उसगाव आणि खांडेपार नदीच्या मुर्डी बाजूला मंगळवारी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. प्रियोळ आणि इतर भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रस्तावित बंधाऱ्यात पाणी साठवून ते लोकांना पुरविणार असल्याचे जलस्रोत खात्याचे साहाय्यक अभियंता शैलेश गावडे यांनी सांगितले.

मात्र, सोनारबाग-उसगाव बाजू तसेच मुर्डी-खांडेपार येथील स्थानिकांनी यामुळे पावसाळ्यात घरात पाणी शिरेल या भीतीने बंधाऱ्याला कडाडून विरोध दर्शविला आहे.

या कामाला आज, मंगळवारपासून सुरवात होणार होती. त्यामुळे काल, सोमवारीच स्थानिकांनी याबाबत फोंडा पोलिसात जाऊन निवेदन दिले होते. तसेच या बंधाऱ्याला कडाडून विरोध करणार असून याचे बांधकाम कसे करतात पाहूच, असा इशाराही दिला होता. अगदी, पोलिस आणा किंवा मिलिट्री आणा, आम्ही तयार आहोत, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला होता.

बंधाऱ्याच्या कामाला सुरवात करण्यासाठी अधिकारी येणार असल्याचे समजल्यावर त्यापुर्वीच स्थानिकांनी बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाण मांडले. पावसाळ्यात घरात पाणी घुसेल, अशी भीती व्यक्त करत या बंधाऱ्याला जोरदार विरोध करण्यात आला.

खांडेपार नदीवर बंधारा बांधण्यावरून उसगाव आणि मुर्डी येथे तणावपूर्ण परिस्थिती असून नदीच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या स्थानिकांचा बंधाऱ्याला कायम विरोध राहणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दरम्यान, मुर्डी येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. महिलांची संख्या जास्त असल्याने महिला पोलिसही तैनात होत्या. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी फोंडा मामलेदार राजेश साखळकर मुर्डी येथे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT