Vasco Latest News Dainik Gomantak
गोवा

Vasco : रस्त्यावर बसणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कारवाई करू; पालिकेचा इशारा

हल्लीच नवीन मार्केटमध्ये स्थलांतरित करण्यात आलेल्या व्यवसायिकांनी पुन्हा रस्त्यावर बसून आपला व्यवसाय थाटला.

दैनिक गोमन्तक

हल्लीच नवीन मार्केटमध्ये स्थलांतरित करण्यात आलेल्या व्यवसायिकांनी पुन्हा रस्त्यावर बसून आपला व्यवसाय थाटला. पालिकेने केलेली कारवाई निष्फळ ठरली. वास्को शहरात येथील काही मोक्याच्या ठिकाणी बसून वाहतूक रहदारीला तसेच पार्किंगला अडथळा आणून तसेच पद पथावर बसून आपला व्यवसाय थाटलेल्या विक्रेत्यांना हल्लीच पालिकेने कारवाई करून त्यांना येथे नव्याने नूतनीकरण करण्यात आलेले पूर्वीच्या मासळी मार्केटमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते.

या मार्केटचा मोठ्या दिमाखात उद्घाटन वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स व इतर नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. बाहेर अत्याव्यस्त ठिकाणी बसून राहिलेल्या सुमारे 50 व्यावसायिकांना या मार्केटमध्ये जागा आखून त्यांना बसविले होते.

Vasco

दरम्यान या मार्केटमध्ये गिऱ्हाईक फिरत नसल्याने या व्यावसायिकांनी आपला मोर्चा पुन्हा रस्त्यावर बसून विक्री करण्यास वळविला आहे. त्यामुळे पालिकेने केलेले प्रयत्न फोल ठरले आहे. त्यांना स्थलांतरित करताना पालिकेने, पुन्हा रस्त्यावर बसणाऱ्यावर कडक कारवाई करू असा इशारा दिला होता. मात्र पालिकेच्या इशाराला न जूमानता व्यवसायिकांनी आपला व्यवसाय पुन्हा रस्त्यावर थाटला. पालिका मात्र सुस्त.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

Education System Crisis: सत्य निकेतनची इमारतच नाही, तर शिक्षण व्यवस्थाही ढासळतेय! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून शिक्षणाच्या बजेटपर्यंत गंभीर प्रश्न

Karapur Mega Project: 161 दिवसांनंतर कारापूरवासीयांचे आंदोलन अखेर मागे! 'वन गोवा' प्रकल्पाला काम बंद करण्याची पंचायतीची नोटीस; न्यायालयीन लढा मात्र सुरूच

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT