Goa Traffic Police Canva
गोवा

Margao News: सावधान! वाहतूकीचे नियम तोडल्यास होणार कडक कारवाई; घ्या 'ही' काळजी

गोमन्तक डिजिटल टीम

Road Safety Campaign from 14th to 20th October By Margao Traffic Police

फातोर्डा: १४ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या रस्ता सुरक्षा मोहिमेंतर्गत मडगाव व सभोवतालच्या परिसरात रस्त्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मडगाव वाहतूक पोलिस निरीक्षक संजय दळवी यांनी माहिती देताना दिली.

रस्ता आघाताला आळा घालण्यासाठी हा निर्णय राज्य सरकारने उचललेला आहे. बेदरकार वाहने चालविणे, सिग्नल तोडणे, ओव्हरस्पिडने गाडी हाकणे, अल्पवयीन मुलांना पालकांनीवाहन चालविण्यास देणे, हेल्मेट न घालता वाहन चालविणे असले प्रकार सर्रास घडत आहे.

यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविण्‍यात आला आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यावर या रस्ता सुरक्षा मोहीमे दरम्यान कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

मडगाव व इतर ठिकाणी वाहतूक पोलिस कार्यरत ठेवण्यात येणार आहे. यात कोलवा सर्कल, आके पॉवर हाऊस, कोकण रेल्वेपरिसर, आर्लेम जंक्‍शन व इतर मोक्याच्या ठिकाणी वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे, असे दळवी यांनी सांगितले आहे.

हा राज्य सरकारचा १३ वा उपक्रम आहे. यावेळी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आपण वाहतूक नियमाचे पालन करून वाहन चालविणे, हा संदेश त्यांना देण्यात येणार आहे. रस्ता अपघातात नाहक बळी जात असल्याच्या कारणाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
संजय दळवी, मडगाव वाहतूक पोलिस निरीक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: अमित पाटकर यांच्याकडून TCP मंत्री आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल!!

Goa Diary: एकेकाळी फेणीसाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव आज बनलंय पर्यटकांचं केंद्र, कोरोनानंतर हा बदल कसा घडला?

गोव्यातील रस्ता सुरक्षा सप्ताह! 'उपक्रम' की जबाबदारी 'लोकांवर' ढकलण्याचा उद्योग

Calangute Beach: यापुढे 'डान्सबारना' थारा नाही; शांतता राखण्यासाठी 'कळंगुट'वासीयांची एकजूट

Goa History: गावड्यांच्या शुद्धीकरणाचे सत्य आणि आदिम सांस्कृतिक जीवनशैली

SCROLL FOR NEXT