Morjim Dainik Gomantak
गोवा

Morjim News : मोदी सरकारचे हात बळकट करा : मुख्यमंत्री

गोमन्तक डिजिटल टीम

Morjim News :

मोरजी, मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी मांद्रे मतदारसंघातील जनतेने भाजपला साथ द्यावी. केंद्र व राज्य सरकार मांद्रे मतदारसंघाच्या विकासाला चालना देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

येथील कळसादेव मांगर सभागृहात आमदार जीत आरोलकर यांनी आयोजित केलेल्या महिला समर्थकांच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी उत्तर गोवा भाजप उमेदवार खासदार श्रीपाद नाईक, आमदार जीत आरोलकर, केरीच्या सरपंच धरती नागोजी, मांद्रेच्या उपसरपंच तारा हडफडकर, तुयेच्या सरपंच सुलक्षा नाईक, पंच स्वीटी नाईक, अनुपमा साळगावकर, सुनीता बुगडे देसाई आदी उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी आणि मगो पक्षाने भाजप सरकारला पाठिंबा दिलेला आहे. भाजप सरकारचे ते घटक असल्यामुळे मांद्रेच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार शंभर टक्के योगदान देईल.

आमदार जीत आरोलकर हे सतत विकासासाठी भुकेलेले असतात. वेगवेगळ्या माध्यमातून ते विकासासाठी आपल्याकडे चर्चा करत असतात. येणाऱ्या काळात रवींद्र भवन, तुये येथील नवीन हॉस्पिटल, इलेक्ट्रॉनिक सिटी असे प्रकल्प मार्गी लावले जातील.

मोदी सरकारने महिलांवर विश्वास ठेवून महिलांना केंद्रबिंदू मानून त्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांबरोबरच प्रत्येक घरापर्यंत अनेक योजना भाजप सरकारने पोचविल्या आहेत. त्याची पोचपावती म्हणून मांद्र्याची जनता श्रीपाद नाईक यांना विजयी करतील. शिवाय केंद्रात ४०० पेक्षा अधिक खासदार निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

आमदार जीत आरोलकर यांनी मोदी सरकारचे हात बळकट केले, तरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारचे हात बळकट होतील आणि त्याचीच मांद्रेच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होईल. आज मोठ्या संख्येने जी महिलांची उपस्थिती आहे, ते पाहिल्यास आणि महिला बूथ कार्यकर्त्यांच्या बळावर श्रीपादभाऊ पुन्हा मोठ्या मतांचा विक्रम प्रस्थापित करतील यात दुमत नाही, असा विश्वास व्यक्त केला.

‘खासदार निधीतून शिक्षण, आरोग्याला प्राधान्य’

श्रीपाद नाईक यांनी सांगितले, की आपण गेल्या २५ वर्षांत खासदार आणि मंत्रिपदाच्या कारकिर्दीत काय केले याचा पूर्ण आढावा प्रत्येक घरात पोचविला जाईल. विरोधी उमेदवारांनी देशासाठी राज्यासाठी काय केले?

याची जाण जनतेला असल्यामुळे आपल्याला जो पाठिंबा मिळत आहे, त्या पाठिंब्यावर आपण पुन्हा विक्रमी मतांनी विजयी होणार आहे. खासदार निधीतून आपण शैक्षणिक, आरोग्य आणि सार्वजनिक प्रकल्पांना प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले.

‘काँग्रेसच्या योजनांची यादी खलपांनी द्यावी’

ज्यावेळी केंद्रात आणि राज्यातही काँग्रेसचे डबल इंजिन सरकार होते. त्यावेळी काँग्रेस सरकारने काय केले हे ॲड. रमाकांत खलप यांना माहीत आहे का? त्यावेळी एक तरी योजना जनतेसाठी राबवली असेल, तर त्याची यादी खलपांनी द्यावी. अन्यथा मोदी सरकारने ज्या योजना आखलेल्या आहेत ते आम्ही सांगू, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

SCROLL FOR NEXT