Street Theater Competition  Dainik Gomantak
गोवा

Street Theater Competition : पथनाट्य स्पर्धेत के. आर. एस. एस. हायस्कूल विजेते

Street Theater Competition : मुख्याध्यापिका हळर्णकर यांनी स्वागत केले. नारायणी तेंडुलकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Street Theater Competition :

सावईवेरे, केरी येथील सूरश्री केसरबाई केरकर विद्यालयात आंतरशालेय पथनाट्य स्पर्धा नुकतीच झाली. विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेची संकल्पना नाट्य प्रशिक्षक गौतम गावडे यांची होती.

या स्पर्धेत पहिले बक्षीस वळवई येथील के. आर. एस. एस. हायस्कूलने पटकावले द्वितीय महिला नूतन हायस्कूल, मडगाव, तृतीय अवर लेडी ऑफ दिवार आणि उत्तेजनार्थ बक्षीसे बालभारती हायस्कूल व दादा वैद्य हायस्कूल कुर्टी यांना मिळाली.

उद्‍घाटन सोहळ्यास कला आणि संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप, सरपंच तृप्ती नाईक, सेंत्रो एदुकादोर संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार कामत, प्रभारी मुख्याध्यापिका थलीमा हळर्णकर आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापिका हळर्णकर यांनी स्वागत केले. नारायणी तेंडुलकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी पोलिस अधिकारी अमृत वळवईकर, राजकिशोर च्यारी, गणेश गुंजीकर, लक्ष्मण गावडे, पोलिस चालक बिंदेश म्हार्दोळकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच श्रेया खांडेपारकर हिलाही गौरविण्यात आले. वेळीप यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

बक्षीस वितरण सोहळ्याला महेंद्र शिरोडकर, प्रभारी मुख्याध्यापिका थलीमा हळर्णकर, ज्येष्ठ शिक्षिका नारायणी तेंडुलकर आदी उपस्थित होते. पाहुण्यांची ओळख तेजस्वी बर्वे यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रावीरा साखरदांडे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ritika Sajdeh: रितिका सजदेहची लक्झरी चॉईस! मुंबईत खरेदी केलं नवीन आलिशान घर; किंमत तब्बल 'इतके' कोटी

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

Madhav Gadgil: पर्यावरणाचा प्रखर प्रहरी, पश्चिम घाटांचे शिल्पकार डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

SCROLL FOR NEXT