गोवा

Dabolim: विमानतळ राष्ट्रीय महामार्ग 17B वरील पथदिवे बंदच, जाहिरात होर्डिंग मात्र कार्यक्षम

गोमन्तक डिजिटल टीम

दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) परिसरात मुख्य रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग 17B वर जाहिरात होर्डिंग वर लावलेली दिवे कार्यक्षम आहेत. परंतु रस्त्यावरील वीज खांबावरील पथदिवे (Street Lamp) बंद असल्याने अपघातांना आमंत्रण दिले जात आहे.

दाबोळी विमानतळ परिसर हा 24 तास नेहमीच गजबजलेला असतो. या विमानतळावर हजारो देशी, विदेशी पर्यटकांची ये-जा सुरू असते. मात्र विमानतळ परिसराशेजारी असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पथ दीव्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वीज खांबावरील पथदीवे सध्या बंदच आहेत. रसत्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारक तसेच, पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. प्रवासी, विमानतळ कर्मचारी, पर्यटक व पादचाऱ्यांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे.

दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने उभारलेल्या जाहिरात होर्डिंगवर लावलेले दिवे कार्यक्षम आहेत. रस्त्यावरील दिवे लावले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गा शेजारी असलेल्या जाहिरात फलक झळकावे यासाठी पथदीप दिवे मुद्दाम म्हणून पेटवले जात नाही ना? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पथदीप पेटवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT