Stray Dogs On Goa Beach canava
गोवा

Stray Dogs On Goa Beach: बाणावलीतील कुत्र्यांना बसवण्यात येणार 'मायक्रोचीप'; आमदार व्हेंझी व्हिएगस यांची माहिती

MLA Venzy Viegas: बाणावलीतील सर्व मालकी कुत्र्यांना मोफत मायक्रोचीप बसविण्याची मोहीम ऑक्टोंबर पासून राबविण्यात येईल,असे बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

बाणावलीत मोठ्या प्रमाणात समुद्र किनाऱ्यावर वावरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना रेबीज लस देण्याची मोहीम त्यासोबतच, बाणावलीतील सर्व मालकी कुत्र्यांना मोफत मायक्रोचीप बसविण्याची मोहीम ऑक्टोंबर पासून राबविण्यात येईल,असे बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी सांगितले.

ते ‘आप’ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मिशन रेबीजचे डॉ. मुरगन अप्पु पिलई, अक्षय पाल उपस्थित होते. दरम्यान, व्हिएगस म्हणाले, येत्या काही दिवसांत आपल्या कुत्र्याला मायक्रोचीप असणे बंधनकारक होणार आहे. त्यामुळे बाणावलीतील जनतेला मोफत मायक्रोचीप बसवून मिळणार आहे. बाणावलीतील सर्व पाळीव कुत्र्यांची माहिती उपलब्ध होईल आणि असे करणारा बाणावली पहिला मतदारसंघ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात दीड लाख भटकी कुत्री

गोव्यात मोठ्या प्रमाणात रेबीज नियंत्रित आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची संख्या आहे. त्यामुळे आपण कुत्र्यांसोबत कशा प्रकारे वागावे, कोणती काळजी घ्यावी, रेबीजचे लसीकरण किती महत्त्वाची आहे याची जनजागृती होणे गरजेचे आहे. राज्यात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढत आहे. सुमारे दीड लाख भटक्या कुत्र्यांची संख्या असून मोकळ्या जागेत कचरा तसेच अन्न टाकल्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे डॉ. मुरूगन यांनी सांगितले.

मायक्रोचीप काळाची गरज!

राज्यातील पाळीव कुत्र्यांच्या गळ्यात असलेल्या मायक्रोचीपमुळे त्या कुत्र्यांची संपूर्ण माहिती मिळेल, लसीकरण कधी केले, पुढील लसीकरण केव्हा करायचे या सविस्तर माहिती मिळेल तसेच एखादा कुत्रा हरविल्यास त्याला शोधण्यासाठी देखील हे चिप महत्त्वाचे ठरणार असल्याचे डॉ. मुरूगन यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संयुक्त अरब जागृती! - संपादकीय

US Iran War: अखेर युद्ध थांबलं! ट्रम्प प्रशासनाची मोठी घोषणा; इराण घातली 'ही' कडक अट

Mapusa Electric Scooter Protest: "90 हजारांची बॅटरी परवडणार कशी" ? म्हापशात ई-स्कूटरची चक्क बँजो वाजवत धिंड !

"वकील उपस्थित होते, मग उलटतपासणी का केली नाही"? 5 वर्षांनंतर 'त्या' प्रकरणी शहाणपण सुचलेल्या संशयिताला कोर्टानं झापलं

VIDEO: "बंदुकीसह सिक्युरिटी चेकपॉईंट तोडून घुसला हल्लेखोर!" ट्रम्प प्रकरणातील नव्या व्हिडिओनं उडवली खळबळ; तपास यंत्रणांचे दणाणले धाबे

SCROLL FOR NEXT