Stray Dogs On Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Stray Dogs On Goa Beach: बॉलिवूडची अभिनेत्री, रशियन महिलेला बीचवर भटक्या कुत्र्याने घेतला चावा, पर्यटक दहशतीखाली

Stray Dogs On Goa Beach: पर्यटकासह अभिनेत्री रय्या लबीबही हल्ल्यात जखमी

गोमन्तक डिजिटल टीम

Stray Dogs On Goa Beach

पर्यटकांना आता समुद्रकिनाऱ्यावर फिरताना मागून कोणता भटका कुत्रा आपल्या पायाचा चावा तर घेत नाही ना, या भीतीच्या छायेत फिरावे लागणार आहे. गेल्या दोन आठवड्यात राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांनी जीव रक्षकांसह पर्यटकांच्या पायांचा चावा घेण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे.

पर्यटक आक्रमक न होता हे भटके कुत्रे त्यांच्यावर चाल करून जात असल्याचे जीवरक्षकांना दिसून आले आहे. जीवरक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडची अभिनेत्री रय्या लबीब सुट्टीसाठी गोव्यात आली होती, तीदेखील या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची शिकार बनली आहे, रय्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाली.

गेल्या आठवड्यात बाणावली किनाऱ्यावर ई-सायकल चालवत असताना एका २४ वर्षीय रशियन महिलेचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला, हे प्रकरण जवळच्या मच्छिमारांनी पहिले आणि तिची त्या कुत्र्यांपासून सुटका केली, या घटनेत तिला किरकोळ दुखापत झाली होती.

महिन्यात लोटली येथील एका २४ वर्षीय महिलेला बाणावली समुद्रकिनाऱ्यावर भटक्या कुत्र्यांनी सहा ते सात वेळा चावा घेतला आणि नंतर तिला लोटली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. कोलवा येथे सकाळी सरावासाठी धावत असलेल्या ज्येष्ठ नागरिक व्यक्तीला कुत्र्यांच्या हल्ल्यास सामोरे जावे लागले. याआधी एप्रिल मध्ये बाणावली येथे भटक्या कुत्र्यांनी दोघांना चावे घेतले होते.

बेताळभाटी, कळंगुट, मांद्रेत जीवरक्षकांना चावे

काल बुधवारी २२ मे रोजी बेताळभाटी समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालताना जीवरक्षक रोशन पाटील याला भटका कुत्रा चावला. मंगळवारी २१ मे रोजी कळंगुट समुद्र किनाऱ्यावर गस्त घालताना जीवरक्षक सर्वेश तांडेल याला किनाऱ्यावर असलेला कुत्रा चावला.

गेल्या आठवड्याच्या अखेरीस जीवरक्षकांच्या कामावर देखरेख करणारे शशिकांत जाधव यांना मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर ई-सायकलवरून गस्त घालत असताना एक भटका कुत्रा तीनदा चावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT