Pernem Court Stray Dogs Dainik Gomantak
गोवा

Stray Dogs: पेडणे न्यायालय परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; ज्येष्ठ नागरिकाचा घेतला चावा, न्यायालयात येणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Pernem Court Stray Dogs: पेडणे येथील दिवाणी न्यायालय परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने न्यायालयात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पेडणे: येथील दिवाणी न्यायालय परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने न्यायालयात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शनिवारी न्यायालयीन कामासाठी आलेल्या तेरेखोल-केरी येथील पावलो रॉड्रिक्स (७५) या ज्येष्ठ नागरिकावर एका भटक्या कुत्र्याने हल्ला करून त्यांच्या पायाचा चावा घेतला. त्यामुळे येथील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पावलो रॉड्रिक्स हे न्यायालयीन कामासाठी दिवाणी न्यायालयात जात असताना इमारतीत बसलेल्या भटक्या कुत्र्यांपैकी एका कुत्र्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्याने त्यांच्या पायाचा चावा घेतल्यानंतर काही वेळ त्यांचा पाय तोंडात पकडून ठेवला.

यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने आरडाओरडा केल्यानंतर कुत्र्याने पाय सोडला. त्यानंतर रॉड्रिक्स यांना तातडीने तुये येथील सरकारी इस्पितळात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सध्या आवश्यक इंजेक्शन्स घेण्यासाठी त्यांना नियमितपणे इस्पितळात जावे लागत आहे.

विशेष म्हणजे, याच न्यायालय परिसरात यापूर्वीही भटक्या कुत्र्यांनी न्यायालयीन कामासाठी आलेल्या दोन व्यक्तींवर हल्ला करून त्यांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे न्यायालयात येणाऱ्या नागरिकांसह काही वकिलांनाही सावधपणे प्रवेश करावा लागत असल्याचे चित्र आहे. काही वेळा हे भटके कुत्रे न्यायालयाच्या आवारातही वावरत असतात.

बंदोबस्त करण्याची मागणी

न्यायालयासारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणीच नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत असल्याने या समस्येची गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे. या प्रकरणी आपण लक्ष घालून न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर वावरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त करण्याची मागणी संबंधित यंत्रणेकडे करणार असल्याची माहिती पेडणे तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मुरारी परब यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चिमुरडीला कोणीतरी खेचत घेऊन चालला, तेव्हा आपलीच मंडळी त्याला हटकत नव्हती..! म्हापशातील दुर्घटनेने उघडे पाडले समाजाचे सुन्न वास्तव

गोव्यातही सरपंचांची थेट निवड व्हावी!

चिमुकलीवरील अत्याचारामुळे संतापाची लाट; टुगेदर फॉर म्हापसा संघटनेचे पालिकेला निवेदन, सुरक्षा उपायांच्या त्वरित अंमलबजावणी मागणी

Revolutionary Goans Party: 'आरजी' ये तेरा क्या हो गया?

VIDEO: 'मला विराट कोहलीसारखं खेळायचंय...' सेहवागच्या मुलाचे वक्तव्य चर्चेत; UAE विरुद्ध 160 धावांची खेळी करत दाखवला दम

SCROLL FOR NEXT