Stray Cattle  Dainik Gomantak
गोवा

Goa News: भटक्या जनावरांना रोखण्‍यास पालिकांना अपयश; थेट कोर्टानेच घेतली दखल

भटक्या गुरांच्या समस्येकडे पालिका गांभीर्याने पाहत नसल्याबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: राज्यातील भटक्या गुरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासंबंधी पालिका संचालकांनी लवकरच मुख्याधिकारी व एनजीओंची बैठक घेऊन आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांची तसेच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले.पुढील सुनावणी 8 फेब्रुवारीला ठेवली आहे.

राज्यातील रस्त्यांवर भटक्या गुरांची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना पालिकांकडून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीच पावले उचलण्‍यात येत नाहीत. रस्ते अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या या गुरांना पकडून कोंडवाड्यात ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडूनही कृती होत नाही. या पार्श्वभूमीवर हा आदेश न्यायालयाने दिला आहे.

कबीर गामा रॉ यांनी उच्च न्यायालयात 2017 मध्ये याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने वेळोवेळी निर्देश देऊन भटक्या गुरांना पकडून त्यांच्या निवाऱ्यासाठी कोंडवाडे उभारावेत असे निर्देश दिले आहेत.

मात्र वेळोवेळी पालिकांकडून जमिनीचा प्रश्‍न तसेच सरकारकडून त्यासाठी आवश्‍यक असलेला निधी मिळत नसल्याची कारणे दिली गेली आहेत. मागील सुनवणीस ही याचिका आली तेव्हा पालिका संचालकांना किती पालिकांकडून रस्त्यावरील भटक्या गुरांना पकडण्यात येते याची माहिती देण्यास सांगितले होते.

संचालकांनी मिळविलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश पालिका व पणजी महापालिकेने याप्रश्‍‍नी कोणतीच ठोस पावले उचलली नसल्याचे खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केले.

साखळी येथे गेल्या काही वर्षांत दोनशे गुरे ताब्यात घेतली आहेत. या भटक्या गुरांच्या समस्येकडे पालिका गांभीर्याने पाहत नसल्याबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT