Election Dainik Gomantak
गोवा

BJP in Lok Sabha Election 2024: चार राज्यांच्या निवडणुकीसाठी दिल्लीत व्यूहरचना; गोव्यातील जागेसाठीही चर्चा

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची शहा, नड्डांसोबत बैठक

गोमन्तक डिजिटल टीम

BJP in Lok Sabha Election 2024: कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या दारूण पराभवानंतर भाजपने देशातल्या इतर चार राज्यांतील निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले असून भाजपशासित प्रदेशांतील मुख्यमंत्र्यांसह पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्यात येणार आहे.

यासंबंधीची महत्त्वपूर्ण बैठक आज, गुुरुवारी दिल्लीत पार पडली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा, संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी चर्चेत भाग घेतला.

प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणाले की, भाजपची केंद्रीय समिती सध्या येत्या काही दिवसांत होणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे.

यासाठीच आज देशभरातील भाजपशासित प्रदेशांतील मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांना दिल्लीत बोलावले होते. या बैठकीत या चार राज्यांच्या निवडणुकांसंदर्भातील रणनीती निश्‍चित करण्यात आली असून ज्या राज्यांत निवडणुका नाहीत, तेथील पक्षाचे नेते, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांच्यावर या राज्यांतील प्रचार आणि आयोजनाच्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री डॉ. सावंत दिल्ली दौरा आटोपून गुरुवारी दुपारी राज्यात दाखल झाले. २०२४ च्या लोकसभा आणि इतर चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी हा दिल्ली दौरा होता, असे ते म्हणाले.

कर्नाटक पराभवानंतर भाजप सावध

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला असून आता २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने अत्यंत बारकाईने सुरू केली आहे.

मात्र, गोव्यातील वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत धाव घेतल्याने मंत्रिमंडळ फेरबदल, राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीबाबत चर्चा रंगल्या होत्या. तथापि, मुख्यमंत्र्यांनी यापैकी कोणत्याही मुद्द्यावर भाष्य करणे टाळले.

तूर्तास बदल नाही : गोव्यात तूर्तास मंत्रिमंडळात बदल केला जाणार नाही. सध्या मंत्रिमंडळात नीलेश काब्राल, माविन गुदिन्हो आणि बाबूश मोन्सेरात हे तीन ख्रिस्ती मंत्री आहेत. त्यांची टक्केवारी 25 टक्के होते.

त्यामुळे मंत्रिमंडळात नव्याने ख्रिस्ती मंत्री नको, असा सूर आहे. जर ख्रिस्ती मंत्र्याला मंत्रिमंडळात घ्यायचे असेल तर ख्रिस्ती मंत्र्यालाच वगळा, अशी सूचना केंद्रीय नेत्यांनी केली आहे.

सदानंद तानावडेंना ‘गो अहेड’

राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी मुदत येत्या महिन्यात संपत आहे. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची निवड निश्‍चित करण्यात आली आहे.

या पदासाठी केवळ तानावडे यांचाच एकमेव अर्ज आल्याने तानावडे यांना ‘गो अहेड’ सिग्नल देण्यात आला आहे. राज्यसभेची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर त्यांचे अधिकृत नाव घोषित केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT