Goa police Arrest mobile phone thief  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: अंध आणि बहिरे असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवून चोरायचे मोबाईल फोन; अखेर तिघेही अडकले पोलिसांच्या जाळ्यात

7.5 लाख रूपयांचे एकूण 23 मोबाईल फोन जप्त

Akshay Nirmale

Goa Police: अंध आणि बहिरे असल्याचा बहाणा करून तिघे चोरटे गोव्यातील नागरिक, पर्यटकांचे मोबाईल फोन चोरायचे.

अगदी त्यासाठी त्यांनी स्वतः अंध आणि बहिरे असल्याचे खोटे ओळखपत्र देखील बनवून घेतले होते. पण, अखेर पणजी पोलिसांनी त्यांची ही 'हुशारी' उघडकीस आणली आहे.

या तिन्ही चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण 23 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या फोन्सची एकूण किंमत 7 लाख 50 हजार रूपये इतकी आहे.

या तिघांची टोळी रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी सावज हेरून चोरी करायची. या तिघांकडे ते दिव्यांग असल्याबाबतचे खोटे ओळखपत्र देखील होते. त्याचा वापर करून ते पर्यटकांची फसवणूक करत होते.

पोलिसांनी या तिघांनीही शिताफिने पकडले. पणजी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निखिल पालयेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. त्यांच्याकडे विविध गुन्ह्यांबाबत चौकशी केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT