Fraud Loans  Dainik Gomantak
गोवा

झटपट कर्ज घेताय.. तर सावधान..!

बोगस वित्तीय कंपन्यांचा सुळसुळाट : वसुलीसाठी छळ

दैनिक गोमन्तक

पणजी : कमी व्‍याजाचे झटपट कर्ज अशा जाहिरातींना भुलून कर्ज घेणाऱ्यांना डोक्‍यावर हात मारून घेण्याची वेळ येत आहे. इतकेच नव्‍हे तर मानहानीलाही सामोरे जात आहे. विविध सामाजिक माध्यमांद्वारे नामांकित कंपन्‍यांच्‍या नावाशी साधर्म्य असलेल्‍या बोगस कंपन्यांचा सध्या सुळसुळाट वाढला आहे.

सामाजिक माध्यमांवर ऑनलाइन कागदपत्रे सादर करून केवळ काही तासांत कर्ज देणाऱ्या बनावट कंपन्‍यांचा सध्या सुळसुळाट वाढला असून अशा प्रकारचे कर्ज घेण्यापूर्वी ग्राहकांनी विचार करावा. तसेच संबंधित कंपनीच्‍या अस्‍तित्‍वाविषयी शहानिशा करावी, असे आवाहन गोवा सायबर गुन्‍हे विभागाचे पोलिस निरीक्षक रितेश तारी यांनी केले.

आजकाल स्‍मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फेसबूक, ट्विटर, यू-ट्यूब, इन्‍स्‍टाग्राम अशा प्रकारच्‍या अनेक समाज माध्यमांचे प्राबल्‍य वाढले आहे. याचा फायदा घेऊन ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या कर्जाच्‍या जाहिराती दिल्‍या जातात. घरबसल्‍या, कोणत्‍याही कागदपत्रांशिवाय, तसेच हमीशिवाय आणि बिनव्‍याजी कर्जाचे अामिष दाखवले जाते. याला अनेक मोबाईल सॅव्‍ही लोक बळी पडतात. काही वेळा गरज म्‍हणून तर काहीवेळा अनवधानाने कर्ज घेतले जाते. एकदा का कर्ज घेतले की सुरुवातीला गोड बोलणारे संबंधित बोगस कंपन्‍यांचे खरे रूप समोर येते. मग लोक आमच्‍याकडे धावत येतात, असे तारी म्‍हणाले.

आजकाल कर्ज घेणे पूर्वीइतके अवघड राहिलेले नाही. आवश्‍यक त्‍या थोड्याशा कागदपत्रांवर कर्ज सहजपणे उपलब्‍ध होते. पण पूर्वी घेतलेल्‍या कर्जाचे हप्ते वेळेवर न फेडल्‍यास किंवा कर्ज थकित गेल्‍यास संबंधित ग्राहकाचा सिबिल स्‍कोर (कर्ज मिळण्यायोग्‍य पात्रता) कमी होतो. यामुळे अशा व्‍यक्‍तीस कोणत्‍याही नामांकित बँकेतून किंवा वित्तीय संस्‍थेतून कर्ज मिळू शकत नाहीत. सिबिल स्‍कोर कमी झालेले लोक बोगस कंपन्‍यांच्‍या जाहिरातींना बळी पडतात, अशी माहिती पर्वरी येथील आर्थिक सल्लागार ए. के. झा यांनी दिली.

आपल्‍याकडे राष्ट्रीय, शेड्युल्‍ड, सहकारी बँकांसह अनेक खासगी बँका कार्यरत आहेत. या बँका आपल्‍या विविध शाखांतून लोकांना सेवा देतात. पण केवळ जाहिराती देणाऱ्या कंपन्‍यांची अशी कोठेही कार्यालये असत नाहीत. त्‍यांच्‍याकडून दिली जाणारी सर्व माहिती बोगस असते.

नामांकित कंपन्‍यांच्‍या नावाशी साधर्म्य ठेवून तसेच लोगो बनवून बँकिंगमधील फारशी माहिती नसणाऱ्या लोकांना गंडवण्याचे काम अहोरात्र सुरू असल्‍याचे झा यांनी सांगितले.

कर्ज घेऊन नंतर पश्‍चाताप करून घेण्यापेक्षा कर्ज घेण्यापूर्वी दहावेळा विचार करावा. तसेच यातील माहितगाराशी सल्लामसलत करूनच कर्ज काढावे. बोगस वित्तीय कंपन्‍यांकडून आपण फसवले जाऊ नये, यासाठी लोकांनीच सतर्क राहावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक रितेश तारी यांनी केले. या बोगस कंपन्‍या अन्‍य राज्‍यांतून चालवल्‍या जातात. किंवा काहीवेळी विदेशातूनही कारभार हाकला जातो. यामुळे अशा कंपन्‍यांच्‍या मुळापर्यंत पोहोचणे शक्‍य होत नाही. कारण ग्राहकाकडे संबंधित कंपनीच्‍या मोबाईल क्रमांकाशिवाय आणखी कसलीही माहिती नसते. यामुळे नागरिकांनीच सतर्कता दाखवून असल्‍या जाहिरातींपासून दूर राहावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक तारी यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Grabbing Case: गोव्यातील भू-माफियांना ईडीचा दणका! बनावट कागदपत्रे बनवून जमीन हडपणाऱ्यांची 6.27 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: रील बनवणाऱ्या मॉडेलचा तमाशा! भररस्त्यात एकाला झोडपलं, सोशल मीडियावर उठली टीकेची झोड; काय घडलं नेमकं?

Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधकांचं 'महाभियोग' अस्त्र; 193 खासदारांच्या स्वाक्षरीसह संसदेत नोटीस दाखल

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT