Chhatrapati Sambhaji Maharaj  Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारणार

शिवप्रेमींचा संकल्प: पालिकेला निवेदन, परवानगीची मागणी

दैनिक गोमन्तक

डिचोली: छत्रपती शिवाजी आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या डिचोलीनगरीत धर्मवीर संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प हिंदू राष्ट्र संघटना आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, डिचोली या शिवप्रेमी संघटनांनी केला आहे. बसस्थानक परिसरात शंभुराजेंचा पुतळा उभारण्यासाठी परवानगी द्यावी,अशी मागणी करणारे निवेदन या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी डिचोली पालिकेला दिले आहे.

हिंदू राष्ट्र संघटनेचे मंदार गावडे यांच्या नेतृत्वाखालील शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता.१२) डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांना हे निवेदन सादर केले. यावेळी सुबोध मोने, गोविंद साखळकर, डॉ. विजय मळीक, शैलेश जाधव, विजय होबळे, नंदेश च्यारी, सिद्धेश सावंत, राहूल धोंड, आषीकेश शिरगावकर, दिनेश घाडी, प्रदीप मोर्या आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शंभूराजे केवळ समशेर बहाद्दरच नव्हते. तर त्याच्या जोडीला त्यांच्याकडे विलक्षण बुद्धिमत्ता, प्रचंड धर्माभिमान, असामान्य अलौकिक प्रतिमा होती. धर्मासाठी कसे जगावे आणि हसतहसत कसे मरावे, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे संभाजी महाराज होय. अशा या धर्मवीर राजांपासून भावी पिढीला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे. या महान ध्येयाने धर्मवीर संभाजी शंभुराजेंचा पुतळा उभारण्याचा संकल्प हिंदू राष्ट्र संघटना आणि शिव प्रतिष्ठान हिंदूस्थान संघटनेतर्फे करण्यात आला आहे, अशी माहिती सुबोध मोने, शैलेश जाधव, मंदार गावकर आणि इतरांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT