Goa Traffic Police Action Dainik Gomantak
गोवा

Traffic Police: अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांचा Special Drive! मद्यपी चालकांसह भरधाव वाहनांवर धडक कारवाई

Goa Traffic Police Action: राज्यातील रस्ता अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आज १३ ते १६ फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम सुरू केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Police Crackdown on Traffic Violations In Goa

पणजी: राज्यातील रस्ता अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आज १३ ते १६ फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम सुरू केली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे. मद्यप्राशन करून तसेच भरधाववेगाने वाहने हाकणाऱ्यांविरुद्ध अधिक लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिली. दरम्यान, मडगावातही अशाप्रकारची विशेष मोहीम उघडण्यात आली आहे.

या विशेष मोहिमेवेळी वाहतूक पोलिस विभागाचे पोलिस कर्मचारी राज्यातील विविध रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत उपस्थित राहून वाहन चालकांवर लक्ष ठेवणार आहेत. अचानक दिवसा काही ठिकाणी वाहनांचे वेग तपासण्यासाठी स्पीड गन सरळ रस्त्यांवर उभारण्यात येणार आहेत.

या विशेष मोहिमेमध्ये चालक परवाना नसताना वाहन चालविणे, अल्पवयीनांनी वाहन चालविणे, हेल्मेशिवाय, चारचाकीमध्ये सीट बेल्ट न लावणे, दुचाकीवर दोघांपेक्षा अधिक स्वार होणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, भरधाववेग, मोडीफाईड सायलन्सर व खासगी वाहने भाडेपट्टीवर देणे याचा समावेश आहे.

पाच वर्षांतील अपघातांची आकडेवारी

राज्यात मागील पाच वर्षांत १३,७६५ अपघात झाले. त्यातील ९२४ भीषण अपघातांत १,०२२ जणांना प्राण गमवावे लागले होते. २०२० मध्ये राज्यात २,३७४ अपघात झाले. त्यातील १४९ भीषण अपघातांत १७२ जणांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये २,८५० अपघात झाले. त्यातील १५० भीषण अपघातांत १६२ जणांचे बळी गेले. २०२२ मध्ये ३,०१२ अपघात झाले. त्यातील २०३ भीषण अपघातांत २२१ जणांना जीव गमवावा लागला होता. २०२३ मध्ये २,८४६ अपघात झाले होते. त्यातील १९९ भीषण अपघातांत २२२ जणांचे मृत्यू झाले. २०२४ मध्ये २,६८३ अपघात झाले होते. त्यातील २२३ भीषण अपघातांत २४५ जणांचा मृत्यू झाला होता.

ध्वनिप्रदूषण करणाऱ्या दुचाकी ताब्यात

कळंगुटात पोलिस पथकाकडून अनेक दुचाकी चालक तसेच चारचाकी चालकांची कसून तपासणी करण्यात आली तसेच ध्वनिप्रदूषण करणाऱ्या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या, असे कळंगुट वाहतूक विभागाचे निरीक्षक सचिन नार्वेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT