CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Poultry Farming: तरुणांसाठी रोजगाराची नवीन संधी! CM प्रमोद सावंतांनी सांगितले पोल्ट्री व्‍यवसायातील नफा-तोट्याचं 'गणित'

Goa Poultry Farmers and Traders Association: फोंड्यातील ॲग्री बाजार प्रकल्पात शनिवारी गोवा पोल्ट्री फार्मर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनतर्फे आयोजित या व्यवसायासंबंधीच्या मार्गदर्शन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: राज्यातील पोल्ट्री उद्योग मोठ्या जोमाने सुरू होऊन जास्तीत जास्त गोमंतकीय युवकांनी या उद्योग-व्यवसायात यावेत यासाठी राज्य सरकारकडून आवश्‍यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. फोंड्यातील ॲग्री बाजार प्रकल्पात शनिवारी गोवा पोल्ट्री फार्मर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनतर्फे आयोजित या व्यवसायासंबंधीच्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्य सरकारच्या पशुसंवर्धन खात्याच्या सहकार्याने पोल्ट्री ट्रेडर्स असोसिएशनतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्‍या व्यासपीठावर पशुसंवर्धन संचालक डॉ. नितीन नाईक, अन्न व औषध प्रशासन संचालका श्‍वेता देसाई, असोसिएशनचे अध्यक्ष जयकृष्ण नाईक, शॉपकिपर असोसिएशनचे अध्यक्ष प्रेस्की सिक्वेरा, इतर पदाधिकारी व मांडवी हेचरिजचे व्ही. के. मनोहर उपस्थित होते.

डॉ. नितीन नाईक व श्‍वेता देसाई यांनीही विचार मांडताना पोल्ट्री असोसिएशनचे कार्य उल्लेखनीय असल्याचे नमूद केले. स्वागत व प्रास्ताविक विशांत नाबर यांनी केले. असोसिएशनचे अध्यक्ष जयकृष्ण नाईक यांनी पोल्ट्री उद्योगासंबंधी माहिती देऊन विविध समस्यांची जाणीव करून दिली. या कार्यक्रमाला राज्यभरातील कुक्कुटपालक तसेच ट्रेडर्स सहभागी झाले होते.

चिकन वेस्‍टची समस्‍या

राज्‍यात मोठ्या प्रमाणात चिकनची आवश्‍यकता भासते. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र चिकन वेस्ट (कचरा) कोठेही फेकण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ते रोखण्यासाठी सरकारकडून मिनी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोव्यात वाढविला तर आपल्‍याला दुसऱ्या राज्‍यांवर अवलंबून रहावे लागणार नाही. कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आपण इतर राज्यांना देत आहोत. हा पैसा जर राज्‍यातच राहिला तर कित्‍येक गोमंतकीयांच्‍या हातांना काम मिळू शकते. अशा होतकरू युवकांसाठी सरकार आवश्‍यक ते सर्व सहकार्य करण्‍यास तयार आहे.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT