CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Recruitment: राज्य कर्मचारी आयोगामार्फतच होणार भरती : मुख्यमंत्री सावंत

Goa Recruitment : खात्यांकडूनच्या भरतीसाठी ३ महिने मुदतवाढ

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Recruitment: राज्य सरकार यापुढील कर्मचारी भरती ही राज्य कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातूनच करणार आहे. केवळ खात्यांच्या माध्यमातून सुरु असलेली भरती पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, या मुदतवाढीमुळे यापुढील कर्मचारी भरती ही खात्यांच्या माध्यमातूनच होणार, असा गैरसमज पसरला आहे. वस्तुस्थिती तशी नाही.

खात्यांच्या माध्यमातून कर्मचारी भरतीचे काही टप्पे उरले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखीन तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. विविध खात्यांनी आपल्याला लागणाऱ्या मनुष्यबळाची मागणी आयोगाकडे केली आहे.

आयोग लवकरच जाहिराती देऊन ती पदे भरण्यासाठी अर्ज मागवणार आहे. खात्यांचा हस्तक्षेप या कर्मचारी भरतीत नसेल. गोवा लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर हा कर्मचारी भरती आयोग स्वतंत्रपणे काम करणार आहे.

सध्या सुरू असलेली कर्मचारी भरती खात्यांच्या माध्यमातून सुरू होणार आहे तर नवीन भरती आयोगाच्या माध्यमातून केली जाणार आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले, की दिल्लीतील गोवा सदन मध्ये पद भरती करण्यासाठी कोकणी सक्तीची करण्यात आली आहे. याआधी कोकणी सक्ती शिथिल करण्यात आली होती.

यावर सक्ती कधी शिथिल केली आणि किती पदे भरण्यात येतील याबाबत विचारले असता ती माहिती आपल्याकडे आता उपलब्ध नाही, असे त्यांनी

सांगितले. २ कोटी १३ लाख रुपयांच्या माहिती व प्रसिद्धी खात्याच्या खर्चाला कार्योत्तर मंजरी देण्यात आली आहे.

झुआरी पुलाच्या छायाचित्रणाच्या ६५ हजार रुपयांच्या खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालये आणि महिला बालकल्याण खात्याने कोविड काळात केलेल्या खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.

‘गोमेकॉ’त प्राध्यापकांची पदे भरणार

‘गोमेकॉ’तील हृदयरोग विभागात तीन सहायक प्राध्यापकांच्या जागा भरण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

इन्फो टेक महामंडळाने घेतलेल्या उन्हाळी शिबिराला मान्यता देण्यात आली. गॅझेटियर खात्यात ३ पदे पून्हा निर्माण कऱण्यास मान्यता देण्यात आली. होम स्टे धोरणातील किरकोळ बदलास मान्यता देण्यात आली आहे.

पर्यटन खात्याचा जनसंपर्क हाताळण्यासाठी मुंबईतील कन्सेप्ट कम्युनिकेशन यांना टुरिझम ३ वर्षांसाठी मान्यता देण्यात आली आहे.यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT