Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Goa Health: गोव्यातील मधुमेह उपचारात क्रांतिकारी बदल होणार; ‘नोवो नॉर्डिस्क’चा गोवा सरकारशी सामंजस्य करार

Vishwajit Rane: गोव्यातील मधुमेहविषयक आरोग्यसेवा सुधारण्यासाठी राज्य सरकार आणि नोवो नॉर्डिस्क एज्युकेशन फाउंडेशनने ''चेंजिंग डायबिटीज बारोमीटर'' या कार्यक्रमाच्या अंतर्गत सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

The Changing Diabetes Barometer Programme Goa

पणजी:गोव्यातील मधुमेहविषयक आरोग्यसेवा सुधारण्यासाठी राज्य सरकार आणि नोवो नॉर्डिस्क एज्युकेशन फाउंडेशनने ''चेंजिंग डायबिटीज बारोमीटर'' या कार्यक्रमाच्या अंतर्गत सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले आहे. या करारामुळे मधुमेह नियंत्रण व उपचार पद्धतीत आमूलाग्र बदल घडणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात पहिले मधुमेह संवर्धन क्लिनिक सुरू केले जाणार आहे. तसेच या माध्यमातून डिजिटल डायबिटीज रजिस्ट्रेशनची सुरुवात करून रुग्णांची माहिती व उपचार अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करता येणार आहे.

मंत्री राणे म्हणाले, मधुमेह लवकर ओळखण्यासाठी राज्यभर प्रो-ॲक्टिव्ह स्क्रिनिंग उपक्रम राबवले जात आहेत. आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत, जेणेकरून रुग्णांना उच्च दर्जाची सेवा प्रदान करता येईल. याशिवाय, मधुमेह केंद्र, मेगा कॅम्प व मधुमेह प्रशिक्षकांच्या घरभेटींद्वारे या उपक्रमाचा विस्तार केला जाणार आहे.

राणे म्हणाले, मधुमेहावरील उपायांसाठी आम्ही एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. आधुनिक तंत्रज्ञान व सामुदायिक कार्यक्रमांच्या माध्यमातून, आम्ही गोव्यातील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी कटिबद्ध आहोत. या नव्या उपक्रमांमुळे गोव्यातील मधुमेह उपचारात क्रांतिकारक बदल होईल आणि नागरिकांना सहज उपलब्ध व दर्जेदार आरोग्यसेवा देखील मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT