Goa Weather| Goa Winter | Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: पहाटे धुक्याची चादर, दुपारी घामाच्या धारा! कसे राहील गोव्यात वातावरण? जाणून घ्या..

Goa Winter: दुपारी आणि रात्री उष्णतेची लाट जाणवत असल्याने नागरिक गोंधळात पडले आहेत. तापमानातील या अनिश्चित बदलामुळे दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत आहे.

Sameer Panditrao

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात चढउतार सुरू असून पहाटेच्या वेळेत थंडीचा जोर अचानक वाढला आहे. ग्रामीण भागात तर सकाळच्या वेळी धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे.

मात्र, दुपारी आणि रात्री उष्णतेची लाट जाणवत असल्याने नागरिक गोंधळात पडले आहेत. तापमानातील या अनिश्चित बदलामुळे दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २०.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

विशेष म्हणजे, कमाल तापमानात सामान्याच्या तुलनेत तब्बल २ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. यामुळे सकाळी थोडासा गारवा जाणवत असला तरी दुपारच्या उन्हात उष्म्याचा तडाखा कायम आहे. तापमानातील या बदलांमुळे सर्दी-खोकला, डोकेदुखी यांसारखे त्रास वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांनी विशेषतः सकाळच्या वेळेत उबदार कपड्यांचा वापर करावा, तसेच दुपारी पाण्याचे सेवन वाढवावे, असा सल्लाही दिला जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार असून विशेष बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तापमानातील चढउतारांचा क्रम काही काळ सुरूच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT