Morpirla School
Morpirla School Dainik Gomantak
गोवा

Morpirla School News : शाळेचे दुरुस्ती काम तत्काळ सुरू करा!

दैनिक गोमन्तक डिजिटल

केपे तालुक्यातील मोर्लपिर्ला येथील पालकांनी सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळेवर घातलेल्या बहिष्कारासंदर्भात गाकुवेध महासंघाच्या शिष्टमंडळाने शाळेला भेट दिली. तेथील परिस्थितीची पाहणी केली. ‘शाळेची दुरवस्था पाहता पालकांचा आपल्या पाल्यांना वर्गात न पाठविण्याचा निर्णय योग्यच असल्याचे आमच्या लक्षात आले’, अशी प्रतिक्रिया शिष्टमंडळाने दिली.

यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष रवींद्र वेळीप, सल्लागार जॉन फर्नांडिस, सरचिटणीस रुपेश वेळीप, राजू भगत, आनंद वेळीप व कोस्तान्सियो फालेरो उपस्थित होते. ‘छप्परे व्यवस्थित नाही, काही ठिकाणी छप्परावर ताडपत्र्या घातल्याचे आढळले.

गतसाली पावसामुळे भिंतीना भेगा पडल्या होत्या त्या तशाच आहेत, विद्यार्थ्यांसाठी शौचालयाची सुविधा मुळीच आरोग्यदायी नसल्याचे निदर्शनास आले. शाळेची इमारत कधीही कोसळू शकते, याची भीती पालकांना आहे. त्यामुळेच पालक विद्यार्थ्यांना वर्गात पाठविण्यास धजत नाही’, असे रवींद्र वेळीप यांनी आज मडगावात पत्रकार परिषदेत सांगितले.

पालक तयार झाले, पण...

शाळेच्या दुरुस्तीच्या कामाचा कंत्राटदाराला देण्यात येणारा आदेश प्रलंबित होता. तो केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता आज सकाळी शाळेत घेऊन आले. मात्र, यात प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीची नोंद नसल्याचे आमच्या लक्षात आले आहे.

पालकांना आजपासून विद्यार्थ्यांना वर्गात पाठविण्यास राजी करण्यात आले आहे हे खरे. पण पुढील दहा दिवसांत प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु केले नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती महासंघाने व्यक्त केली.

शाळेकडे दुर्लक्ष का केले?

मोरपिर्ला शाळेत 100 टक्के विद्यार्थी एसटी समाजाचे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दहावीचा निकाल 100 टक्के लागत आहे. शिवाय मुख्याध्यापिका मारिचया मोरेना मिरांडा यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान झाला आहे. गाकुवेधच्या आंदोलनाच्या वेळी 2011 साली हुतात्मा झालेले दिलीप वेळीप हे शाळेच्या परिसरातील आहेत. एवढे सर्व असताना सरकार या शाळेकडे सरकार कसे काय दुर्लक्ष करु शकते? असा सवाल सरचिटणीस रुपेश वेळीप यांनी केला.

अन् विद्यालय गजबजले: मोरपिर्ला सरकारी विद्यालयाची स्‍थिती दयनीय झालेली आहे. इमारतीची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भातील अनेकदा केलेल्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने पालकांनी शैक्षणिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी आपल्या मुलांना शाळेत पाठविले नव्हते.

माध्यमिक शाळेची आता काही प्रमाणात दुरुस्ती केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शाळेच्या दुरुस्तीचा आदेश दिल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना आज शाळेत पाठविले, अशी माहिती आमदार एल्टन डिकॉस्‍टा यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT