Calangute Crime News : ड्रग्सप्रकरणी मुंबईतील महिलेला बाणावलीत अटक

50 हजाराचा एमडीएमए ड्रग्स जप्त के
Crime Branch Arrested Women
Crime Branch Arrested WomenDainik Gomantak

Drugs Case : बाणावली - सासष्टी येथे गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेने रात्री उशिरा संशयास्पद फिरणारी खार - मुंबई येथील महिला मंगला विशाल कुराडकर (वय 40) हिला ड्रग्सप्रकरणी अटक केली. तिच्याकडून 50 हजाराचा एमडीएमए ड्रग्स जप्त केला असून तिची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

Crime Branch Arrested Women
Calangute News : हडफडेत मोबाईल टॉवरवरून आमदार-सरपंच आमनेसामने

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांबरोबर आता महिलाही ड्रग्स विक्री व्यवसायात झटपट पैसा मिळवण्याच्या आशेने आल्या आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यात यावर्षी दोन महिलांना अटक झाली आहे. त्यामध्ये या मुंबईच्या महिलेचा समावेश आहे. ही संशयित महिला बाणावली येथील एका हॉटेलच्या बाहेर पर्यटकांशी संवाद साधत असल्याने पोलिसांना संशय आला.

तिला ताब्यात घेतल्यावर ती बिथरली. तिची महिला पोलिसांनी झडती घेतली असता तिच्याकडे ड्रग्स सापडला. ती गेल्या काही दिवसांपूर्वी गोव्यात आली असून बाणावली येथेच भाडेपट्टीवर राहत असल्याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर अधिक तपास करत आहेत.

Crime Branch Arrested Women
IDC Project : आयडीसी’मधील प्रकल्प बंद : उद्योगमंत्री माविन यांंची कबुली

पर्यटक मोहजाळात

किनारपट्टी भागाबरोबरच काही अंतर्गत भागातील हॉटेल परिसरात काही ड्रग्स विक्रेते घुटमळत असतात. गोव्यात येणारे पर्यटक अनेकदा ड्रग्सचा आस्वाद घेतात. त्यामुळे ड्रग्स विक्रेते किंवा दलाल हॉटेल्सच्या परिसरात किंवा त्याच्या पार्किंग लॉबीमध्ये पर्यटकांना मोहजाळात अडकवून फसवतात.

त्यामुळे पोलिसांनी आता रेस्टॉंरंट्सच्या परिसरात गस्त सुरू ठेवली आहे. विदेशी नागरिक हे महागडे ड्रग्स खरेदी करतात, तर देशातील पर्यटक मजा म्हणून गांजा खरेदी करतात. झटपट पैसे मिळवण्याच्या आमिषाने बेरोजगार असलेले परप्रांतीय या व्यवसायाकडे वळत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com